पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार-2018 कुलगुरू डॉ.ए.एस.ढवण यांच्या हस्ते होणार प्रदान
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील पू.नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठाण,अंबाजोगाई च्या वतीने मागील 9 वर्षांपासून शैक्षणिक अथवा सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या एका व्यक्तीस पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने गौरविले जाते.यावर्षी हा पुरस्कार प्रविणकुमार श्रीराम काळम पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती,गेवराई ता.गेवराई जि.बीड) यांना शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय कार्यासाठी जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण दि.7 सप्टेंबर 2018 रोजी 4.00 वा.मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे होणार आहे.प्रविणकुमार श्रीराम काळम पाटील यांना सदरील पुरस्कार डॉ.ए.एस.ढवन(कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रूपयांचा धनादेश,स्मृतिचिन्ह, सन्मानपञ,शाल व पुष्पगुच्छ असे आहे.यापुर्वी हा पुरस्कार प्राचार्य प्रतापराव बोराडे, गोपाळराव पाटील, सि.ना.आलुरे गुरूजी, मोहनराव सोळुंके, डॉ.नागनाथ कोत्त्तापल्ले,द.रा.कुलकर्णी, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,संदीप पवार,महात्मा ज्योतिबा फुले वसतिगृह, अंबाजोगाई-डॉ.सुरेश खुरसाळे या मान्यवर व्यक्ती व संस्थांना प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.यावर्षी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आण्णासाहेब खंदारे व अनेक शिक्षण तज्ञ उपस्थित राहणार आहेत.पुरस्कारासाठीची निवड हि प्रतिष्ठाणच्या निवड समितीचे सदस्य प्राचार्य प्रतापराव बोराडे,माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड,प्राचार्य अनिरूद्ध जाधव यांच्या शिफारशी वरून करण्यात आली आहे.या कार्यक्रमात नारायणदादा काळदाते उच्च शिक्षण सहायता निधी मार्फत गरजु व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल.तरी या कार्यक्रमास अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प.पू.नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जी.जी.रांदड, उपाध्यक्ष एस.के.जोगदंड व सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी केले आहे.
प्रविणकुमार काळम पाटील यांचे प्रेरक कार्य
गेवराई पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्य करताना निस्वार्थ वृत्तीने नविनतेचा ध्यास घेवून समाज व शिक्षकांना प्रेरणा देणारे कार्य प्रविणकुमार काळम पाटील हे करीत आहेत.विचार व कृति यातील नाविन्य जपणारे अधिकारी म्हणून सृजनातून आनंद हे प्रमाण मानून प्रभावी कार्य करतात.याची दखल घेवून पुरस्कारासाठी निवड.
गरजु व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत
नारायणदादा काळदाते उच्च शिक्षण सहायता निधी मार्फत दरवर्षीच गरजु व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येते.आत्तापर्यंत प्रतिष्ठान मार्फत एकूण 46 विद्यार्थ्यांना तब्बल 21 लाख 46 हजार एवढी मदत करण्यात आली.ज्यात वैद्यकिय-14, अभियांञिकी-24,चार्टड अकाऊंटंट-2, एम.बी.ए-1,बी.फार्मसी-2,बायोटेक्नॉलॉजी-1,इतर-2 अशा एकूण 46 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment