Tuesday, January 29, 2019January 29, 2019
आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सबंध जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष या निवडणुक निकालाकडे लागले होते. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सभापतीपदी कॉंग्रेसचे दत्ता बोंढारे तर उपसभापतीपदी धु्रपत पाईकराव यांची निवड झाल्याने विधानसभेची रंगीत तालिम कॉंग्रेसने जिंकली आहे.
युती आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. विशेष म्हणजे या निवडणुक पुर्वीपासूनच चर्चेत होती. निवडणुक निकालापासून सभापतींच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सभापती युतीचा की आघाडीचा यावर चर्चाही झडत होत्या. अखेर 28 जानेवारी रोजी याला पुर्णविराम मिळाला असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचे पुत्र दत्ता बोंढारे यांना 9 मते पडली तर त्यांच्या विरोधात असलेल्या माजी खा.शिवाजीराव माने यांचे पुतणे दत्ता माने यांना 8 मते पडली. तर उपसभापती झालेल्या धु्रपत पाईकराव यांना 9 तर सेनेच्या भरत देसाई यांना 8 मते मिळाल्याने सभापतीपदी दता बोंढारे तर उपसभापतीपदी धु्रपत पाईकराव यांची निवड झाली आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे निवडुन आलेले संचालक नितीन कदम हे गैरहजर होते. याच कारणामुळे अनपेक्षित निकाल लागतो काय अशी राजकीय वर्तुळात रंगलेली चर्चा फोल ठरली. शिवसेनेच्या ताब्यात असलेली आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आता आघाडीच्या ताब्यात गेली आहे. मतदान निकालापासून संचालकांना अनेक प्रलोभने दाखविण्यात आली होती. काही संचालकांच्या सहलीही घडवून आणल्या होत्या. पण अखेर कॉंग्रेसने विधानसभेचे ट्रायल जिंकून निवडणुकीच्या तोंडावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, सहाय्यक निबंधक एस.एल.बोलके यांनी काम पाहिले. या निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेता बाळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला हेाता. या निवडीनंतर सभापती, उपसभापती यांची आखाडा बाळापूर शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान, नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचे खा.राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे पाटील, विलास गोरे, बापुराव घोंगडे, सरपंच म.झिया कुरेशी, उपसरपंच विजय बोंढारे पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजहर पठाण, मजहर पठाण, मध्यवर्ती बॅंकेचे संचालक सुरेशराव वडगावकर, चेअरमन पांडुरंग बोंढारे, मो.गौस, धिरज पंडीत आदींनी अभिनंदन केले.
विधानसभेचे ट्रायल कॉंग्रेसने जिंकली; बाळापूर बाजार समितीच्या सभापतीपदी बोंढारे तर उपसभापतीपदी पाईकराव
By Marathwada Neta
Tuesday, January 29, 2019

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment