पंधरावा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा आज मेथा येथे

Tuesday, January 29, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
औंढा तालुक्यातील मेथा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पंधरावा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा 29 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात जिल्ह्यातील वर्ग 5 वी ते 10 वी पर्यंत सर्व शाळेतील स्काऊट व गाईड सहभागी होणार आहेत. उद्घाटन 29 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जि.प.अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे यांच्या हस्ते व जि.प.सिईओ डॉ.एच.पी.तुम्मोड, ज्ञानोबा मुंढे यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 डिसेंबर रोजी मुख्य शेकोटीचा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य मनिष आखरे, पं.स.सदस्य सुरेश कुडंकर, वेतन पथक अधिक्षक मनोज भातलवंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याचा समारोप व बक्षिस वितरण 31 डिसेंबर रोजी होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून खा.राजीव सातव, आ.डॉ.संतोष टारफे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेशकुमार, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांची उपस्थिती राहणार आहे.

मेळावा दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, ध्वजारोहन स्पर्धा, बिनभांड्याचा स्वयंपाक, संचलन, लेझीम, तुंबू सजावट, तंबू उभारणी, प्रथमोपचार, प्रदर्शन, शोभा यात्रा आदी स्पर्धा होणार आहेत. वर्ग 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व संबंधीत शाळेने पाठवावे असे आवाहन शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.के.इंगोले, प्राचार्य गणेश शिंदे, जिल्हा मुख्य आयुक्त शिवाजी पवार, जिल्हा सरचिटणीस अशोक पवार, जिल्हा संघटक जे.एन.असोले, माधुरी दळवी यंानी केले आहे.

No comments:

Post a Comment