सातव महाविद्यालयात आज स्नेहसंमेलन शांताबाई फेम राधिका पाटील यांची उपस्थिती

Tuesday, January 29, 2019

कळमनुरी / प्रतिनिधी
येथील कै.शंकरराव सातव महाविद्यालयात 29 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शांताबाईफेम राधिका पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

29 जानेवारी रोजी येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी 6 वाजता उद्‌घाटन सोहळा व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गार्डन हील इंग्लिश स्कूल व सातव महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच 30 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी आपल्या कलागुणांचा मुक्त अविष्कार करणार आहेत. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत महाराष्ट्राच्या शांताबाईकडून सुप्रसिद्ध असलेल्या राधिका पाटील यांचा लावण्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या सचिव डॉ. प्रज्ञाताई सातव, महाविद्यालयाचे प्राचार्य बबन पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment