हिंगोली / प्रतिनिधी
शहरातील एका इंग्रजी शाळेत इयता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दैनंदिन गृहपाठ केला नसल्यामुळे शिक्षकाने मारहाण करून डोक्याची केस उपटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. याबाबत पालक तक्रार दाखल करण्याच्या मनस्थितीत असताना संस्थाचालकांनी पालकाच्या हातापाया पडल्याने या प्रकरणावर पडदा पडल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.
दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सर्वसाधारणपणे सर्वच पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत दाखल करीत आहेत. आडमाप फिस मोजून पालक विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचे सोनेरी स्वप्न रंगवत असताना शहरातील एका इंग्रजी शाळेत 12 डिसेंबर रोजी धक्कादायक प्रकार घडला आहे. इयता पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 11 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेतून दिलेला नियमीत गृहपाठ का करून आणला नाही. व हस्ताक्षर खराब असल्याचे कारण पुढे करत एका शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याच्या पायावर मारहाण करण्यात आली आहे. याहीपुढे जावून किळसवाना प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस शिक्षकाने उपटले आहेत. विद्यार्थ्यांने ही सर्व माहिती घरी आल्यानंतर पालकाला सांगितली.
त्यानंतर संतप्त झालेल्या पालकाने याबाबत पोलीसात तक्रार करण्याची तयारी चालविली असता ही माहिती संबंधित शिक्षक व संस्थाचालकाला कळाल्यानंतर संस्थाचालकाने काही करू नका, अशी विनंती करत पालकांसमोर हात पाय जोडले तसेच संबंधित शिक्षकानेही विद्यार्थी व पालकाची बिनशर्थ माफी मागितली. त्यामुळे पालकाने याबाबत कोठेही अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याचे समजते. पण या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या शाळेमध्ये शिक्षकांच्या हेकेखोर व मगरूर पणामुळे यापुर्वीही अनेक प्रकार घडले आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment