सर्वच आघाडयांवर मोदी सरकार अपयशी : शरद पवार

Monday, September 10, 2018

नवी दिल्ली: मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारने मागील ४ वर्षाच्या काळात महागाई वाढवली पेट्रोल डिझेल व गॅस चे दर वाढवून नोटबंदी सारख्या आततायी निर्णय घेतले हि कामगिरी बहाद्दूर माणसाची असल्याने भाजप सरकारने मोठी बहादुरकी गाजवण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले .  सध्याचं सरकार जनविरोधी असून चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यानेच जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली. 

विरोधकांनी रामलिला मैदानावर सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला संबोधताना शरद पवारांनी हा हल्ला चढवला. ३० ते ४० वर्षात काहीच झालं नाही. या सरकारने चार वर्षात गॅसचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले ही बहादुरी केली. इंधन दर गगनाला नेऊन ठेवले ही बहादुरी केली. आंतराराष्ट्रीय बाजारात रुपया घसरला ही बहादुरी केली, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. आपण सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलो आहोत, हे सत्ताधाऱ्यांनी मान्य केलंच पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

चाळीस वर्षात काहीच झालं नाही, असं भाजपचं म्हणणं असतं. पण विरोधी पक्षात असताना स्वत: अटलबिहारी वाजपेयी यांनीच भाजपला सुनावले होते. चाळीस-पन्नास वर्षात काहीच झालं नाही असं म्हणणं म्हणजे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचा अवमान आहे. रोजगार वाढल्याकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार आहे, असं वाजपेयींनी सुनावलं होतं, याची आठवणही त्यांनी करून दिली. हे सरकार जनविरोधी असल्याचं लोकांना पटवून दिलं पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment