6 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत, आ.मुटकुळेंची माहिती

Friday, February 1, 2019
हिंगोली / प्रतिनिधी
हिंगोलीत छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा व्हावा, अशी इच्छा शिवप्रेमींच्या मनात होती. येथील शासकीय विश्रामगृहाजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम झाले आहे. या पुतळ्याचे अनावरण 6 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली. 



गेल्या दोन वर्षापासून हिंगोलीत छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू होते. आता हे काम पुर्णत्वास आले आहे. काम पुर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कधी होते, अशी उत्सूकता संबंध शिवप्रेमींना होती. अखेर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाची तारीख 6 फेबु्रवारी रोजी ठरली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. 

दुपारी 1 वाजता पुतळा अनावरण कार्यक्रम होणार असून त्यानंतर येथील रामलिला मैदानावर शेतकरी मेळावा व महिला बचत गट मेळावा पार पडणार आहे, अशी माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली असून 1 फेब्रुवारीला रोजी येथील रामलिला मैदानावर मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी आ.तान्हाजीराव मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष कैलास काबरा, प्रकाश थोरात, फुलाजी शिंदे, संजय ढोके, बाबा घुगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उमेश नागरे, मनिष शर्मा, प्रशांत सोनी, संतोष टेकाळे, हमीद प्यारेवाले, श्रीरंग राठोड, संदिप वाकडे आदींची उपस्थिती होती.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 7083550505 हा आमचा नंबर


No comments:

Post a Comment