हॉटेल सुरभीमुळे लातूरच्या खाद्य संस्कृतीत भर - आ. अमित देशमुख

Friday, December 21, 2018


लातूर /प्रतिनिधी : लातूर शहर हे विविध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे . इथला शैक्षणिक पॅटर्न राज्यात नांवारूपाला आलेला आहे . त्याचपद्धतीने लातूरची खाद्य संस्कृतीही नावाजलेली असून नव्याने सुरू होणाऱ्या हॉटेल सुरभीमुळे लातूरच्या खाद्य संस्कृतीत भरच पडणार असल्याचे मत माजी राज्यमंत्री आ.अमित देशमुख यांनी व्यक्त केले . 

लातूर- बार्शी रस्त्यावर महिला तंत्रनिकेतनच्या समोरील बाजूस राहुल ( मुन्ना ) राचटटे यांनी सुरू केलेल्या हॉटेल सुरभीचे उद्घाटन करताना आ. देशमुख बोलत होते . व्यासपीठावर माजी महापौर तथा पालिकेतील विरोधी पक्ष नेते दीपक सूळ , माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे , स्थायी समितीचे माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे , समद पटेल , नरेंद्र अग्रवाल , सत्तार पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती . 

आ .देशमुख म्हणाले की , सध्या कुठलाही व्यवसाय करणे कठीण झाले आहे . सरकारची धोरणे सतत बदलत असल्याने नव्या व्यवसायाची घडी बसणे कठीण आहे . अशा स्थितीत राचट्टे यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे . शहराच्या बाहेर जाणाऱ्या चार रस्त्यांपैकी बार्शी रस्त्यावर फारशी हॉटेल नव्हती . हॉटेल सुरभीमुळे ही कमतरता भरून निघणार आहे . याच परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय , आरोग्य संकूल , ऑफिसर्स क्लब आणि पालिकेचे सभागृह नियोजित आहे . त्यामुळे या भागाचा झपाट्याने विकास होणार आहे . त्यात आता या हॉटेल मुळे नागरिकांची सोय होणार आहे . या हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक होणार आहे . त्यामुळे खवय्यांना चांगले अन्न मिळनार आहे , असेही ते म्हणाले . 

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा मुन्ना राचट्टे , संजय चिटकोटे , डॉ. महेश पाटील यांनी सत्कार केला . यावेळी संतोष ब्याळे ,संभाजी जाधव ,इरण्णा मंगरुळे ,विजयकुमार शेटे ,बाबुराव कुंभार यांच्यासह राचट्टे व पावले परिवारातील सदस्यांची ,मित्रपरिवाराची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment