कुठे आणि किती रूपयांचे आहे पॅकेज
IRCTC चे हे पॅकेज वेगवेगळ्या जागांसाठी आहे. गोव्याच्या तीन रूट्सवर वेगवेगळी किंमत द्यावी लागेल. जर तुम्हाला नॉर्थ गोव्यात फिरायचे असेल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 400 रूपये खर्च येईल आणि जर साउथ गोवा फिरायचे असेल तर त्यासाठीही 400 रूपये खर्च येईल. जर तुम्ही नॉर्थ आणी साउथ दोन्ही पॅकेज निवडता तर तुम्हाला फक्त 600 रूपये द्यावे लागतील. हे पॅकेज तुम्हा गोव्यात जाउन देखील सलेक्ट करू शकता.
नॉर्थ गोव्यात आहेत या जागा
या टूर पॅकेजमध्ये नॉर्थ गोव्याचा साउथ सेंट्रल गोवा, डोना पाउला, गोवा सायंस म्यूजिअम, मिरामार बीच, कला अकादमी, भगवान महावीर गार्डन, पंजिम मार्केट, कसीनो प्वॉइंट, रिवर बोट क्रूज आणि ओल्ड गोवासहित इतर स्थानांचा समावेश आहे.
साउथ गोव्यात आहेत या जागा
साउथ गोवा टूरमध्ये अगुआडा फोर्ट (Aguada fort), Sinquerim Beach, सेंट अँथनी चॅपल, सेंट अॅलेक्स चर्च, Calangute Beach, बागा बीच (Baga Beach), Chapora Fort आणि Vagator Beach सामील आहेत. तर कॉम्बो टूर पॅकेजमध्ये नॉर्थ आणि साउथ टूर पॅकेजमध्ये सगळ्या डेस्टिनेशन सामील आहेत.
या आहेत सुविधा
या टुर पॅकेजमध्ये सुरक्षा बेल्ट सोबतच आरामदायी बसने प्रवास, प्रत्येक बस स्टॉपवर तक्रार कार्यालय अनुभवी स्टाफ इत्यादी सेवा मिळतील.

No comments:
Post a Comment