शिक्षण संस्थाचालकांचे आळंदीला दोन दिवसीय अधिवेशन

Friday, December 21, 2018




लातूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने सरकार व शिक्षण संस्थाचालक यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी आळंदी येथे 22 व 23 डिसेंबर 2018 असे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण संस्थाचालक संघाचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांनी दिली. 

या अधिवेशनाचे उदघाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोपाच्या समारंभास माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती राहणार असून दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीयमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील हे भूषविणार आहेत.

या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्ञानसाधना ही स्मरणिका प्रकाशीत करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीमध्ये सरकार व संस्थाचालक यांच्या भूमिका तसेच शिक्षण संस्थांमध्ये अपारंपारिक विजेचा वापर (सोलार) या विषयाचे लेख प्रसिद्ध होणार आहेत. 

या अधिवेशनास शिक्षण संस्थाचालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण संस्थाचालक संघाचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार, कोषाध्यक्ष प्राचार्य डी.एन. केंद्रे, संस्थाचालक संघाचे सरचिटणीस प्रा. गोविंदराव घार, सचिव प्राचार्य बाबूराव जाधव, पंडीतराव धुमाळ, डी.बी. लोहारे गुरूजी, संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जे.जी. सगरे, प्रा. ओमप्रकाश साकोळकर, भगवानराव पाटील तळेगावकर, विक्रम दोडके, पी.एन. बंडगर, राजेंद्र इंद्राळे आदींनी केले आहे.



No comments:

Post a Comment