श्री गणेशाची नावे, आवडते खाद्य, शस्त्रे

Saturday, September 8, 2018

श्री गणेश आपणास काय संदेश देतो  आपल्या सर्वांचे लाडके व आद्यदैवत श्रीगणेशाला अनेक नावे आहेत व आपण त्यांना त्या नावाने का संबांधतो. त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे.

  • १) गौरीतनय, गौरीपुत्र, उमासुत, शिवसुत : भगवान शिवशंकर व माता पार्वतीचा सुपूत्र म्हणून ही नावे आहेत.
  • २) गणपती, गणनायक, गणेश गणध्यक्ष : सर्व गणांचा तो पती, नायक, ईश, अध्यक्ष म्हणून ही नावे आहेत.
  • ३) गजमुख, गजानन, गजवक्र : गज म्हणजे हत्ती व मुख, आनन म्हणजे तोंड, त्यांचे मुख हत्तीचे आहे म्हणून ही नावे आहेत.
  • ४) भालचंद्र : त्यांच्या कपाळावर चंद्रकोर आहे म्हणून हे नाव आसहे.
  • ५) एकदंत : त्यांना एकच दात आहे म्हणून हे नाव आहे.
  • ६) लंबोदर : उदर म्हणजे पोट, त्यंाचे पोट लांब, मोठे आहे म्हणून हे नाव आहे.
  • ७) शूर्पकर्ण : शूर्प म्हणजे सूप व कर्ण म्हणजे कान. त्यांचे कान हे सूपासारखे आहेत म्हणून सहे नाव आहे.
  • ८) सिंदूरवर्णी : त्यांना सिंदूर अतिशय आवडते म्हणून हे नाव आहे.
  • ९) विश्‍ववंद्य : ते सर्व विश्‍वाला वंदनीय आहे म्हणून हे नाव आहे.
  • १०) मूषकवाहन : त्यांचे वाहन मूषक म्हणजे उंदीर आहे, म्हणून हे नाव आहे.
  • ११) परशुधारी : त्यांनी हातामध्ये परशु धारण केले आहे म्हणून हे नाव आहे.
  • १२) चतुर्भूज : त्यांना चार भुजा म्हणजे हात आहेत म्हणून हे नाव आहे.
  • १३) सर्व सिद्धीप्रदायक : सर्व प्रकारच्या सिद्धी ते प्रदान करतात म्हणून हे नाव आहे.
  • १४) विघ्नहर्ता : भक्तांचे, सर्वांच्या विघ्नाचे हरण करणारा दूर करणारा म्हणून हे नाव आहे.
  • १५) सर्वविद्याप्रदायक : सर्व प्रकारच्या विद्या प्रदान करणारा म्हणून हे नाव आहे.

ही अनेक नावे गणेशाला आहेत. तसेच श्री गणेश त्यांच्या अद्भूत रूपातून आपणास अनेक शुभ संदेश देतात.
श्री गणेशास प्रिय : सुपारी, विडा, मोदक, नारळ
श्री गणेशाची शस्त्रे : परशु, अंकूश, मुष्ठर, खटवांग, नागबंद, खेटक, शूल.
श्री गणेशास आवडतात : कमल, अनंतफूल, केवडा, मंदार, दुर्वा, शनी, चंद्रकोर, स्वस्तिक, ओम (ॐ), श्री.
अशा ओंकारस्वरूप, चिद्स्वरूप, सत्स्वरूप, श्री गणेशास साष्टांग वंदन.
गणपती बप्पा मोरया.

  • * श्री गणेशाचे चक्षू (डोळे) : श्री गणेश लंबोदर आहे. मोठा आहे पण त्यांचे डोळे बारीक आहेत तर ते सूक्ष्म निरीक्षक करतात. आपण ही प्रत्येक गोष्टीला बारकाईने पहावे असा संदेश आपणास मिळतो.
  • * श्री गणेशाचे कर्ण (कान) : श्री गणेशाचे कान हे सुपासारखे आहेत. सुपाचे काम चांगले आत ठेवणे व वाईट बाहेर टाकून देणे तसेच आपण ही चांगले फक्त घ्यावे आणि वाईट टाकून द्यावे हा असा संदेश आपणास मिळतो.
  •  श्री गणेशाचे पोट (उदर) :  श्री गणेशाचे पोट हे मोठे आहे. त्यामध्ये सर्व काही सामावून घेण्याची शक्ती आहे. माझी चूक पोटात घ्या असे आपण म्हणतो. तसाच यातून संदेश आहे की तो तर सर्वांचे पोटात घेतो. आपणही पोटात ठेवावे. हा असा संदेश आपणास मिळतो. 
  • श्री गणेशाचे वाहन (मूषक) : श्री गणेशाचे वाहन मूषक हे आहे. एखादा छोटासा प्राणी देखील किती उपयुक्त असू शकतो. तसेच त्याला आपले वाहन बनवून त्याला महतव प्राप्त करून दिले. प्राणीमात्रावर दया करावी व एवढ्याशा प्राण्यालाही महत्व द्यावे हा संदेश मिळतो.
  •  श्री गणेशाला वाहणार्‍या दुर्वा, शमी, फुले इ. : हे सर्व वाहण्यामागे अनेक गोष्टी तर आहेतच आपण वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर त्या प्रत्येक वनस्पती आरोग्यहिताकरी आहेत व त्या आपण श्री गणेशासाठी आणतो, शोधतो. त्यामुळे आपण निसर्ग व त्या वनस्पतींच्या सान्निध्यात जातो व आपले आरोग्य उत्तम राहते. तसेच तृणाइतक्या लहान वनस्पतीलाही स्वतः धारण करून त्याला महत्व प्राप्त करून दिले.
  •  श्री गणेशाचे आवडते मोदक : मोद म्हणजे आनंद, आनंद देणारा कळ्याकळ्याने खुलणारा व मिळणारा आनंद म्हणजे मोदक आपण स्वतः आनंदी राहावे व इतरांनाही आनंदी ठेवावे हा संदेश मोदकातून आपणास मिळतो. अशाप्रकारे अध्यात्मक व विज्ञान यांची सांगड, सुरेख संगम म्हणजे श्रीगणेश आहेत.

No comments:

Post a Comment