मंदार व शमी गणेशाला का प्रिय?

Saturday, September 8, 2018

वितिहोत्र नावाचे एक नगर होते. त्या नगरात औरव नावाचा ब्राह्मण आपली पत्नी सुमेधा हिच्यासह राहत होता. त्यांना एक कन्या होती. तिचे नाव शमी. ती त्यांची अतिशय लाडकी होती. औरवाने तिच्यासाठी धौम्यांचा पुत्र मंदाराची निवड केली. तो मंदार शौनक त्रषींचा प्रिय शिष्य होता. त्यालाच शमी दिली. शमीचा व मंदाराचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. ते दोघे आनंदाने संसार करत असता एके दिवशी भृशुंडी ऋषी त्यांच्याकडे आले. त्यांचा अजस्त्र देह व पोटही मोठे होते. त्यांच्या भुवयातून सोंड आली होती. त्यांच्या विचीत्त देहाला पाहून मंदार व शमीका दोघही हसले. तेव्हा ऋषीवर्यांना भयंकर राग आला व रागाच्या भरात त्यांनी शाप दिला, तुम्ही दोघे मला हसलात म्हणून तुम्ही वृक्ष होऊन राहाल व त्या झाडाकडे कुणी येणार नाही. ऋषीच्या शापाने तया दोघांचे वृक्षात रूपांतर झाले.

औरव शौनक ऋषीकडे आले. शौनक ऋषीने आंतरचक्षूने जाणले की भृशुंडीच्या शापाने दोघांचे वृक्षात रूपांतर झाले आहे. तेव्हा औरवाने १२ वर्ष गजाननाचे नामस्मरण केले. गजानन प्रसन्न झाले. तेव्हा औरव व शौनक गजाननाला प्रार्थन करून म्हणाले, देवा, शमिका व मंदारची वृक्ष योनीतून मुक्तता करावी हीच अपेक्षा आहे. त्यावर गजानन म्हणाला, माझा प्रिय भक्त भृशुंडी याची शापवाणी खोटी ठरणार नाही. परंतू मी स्वतः मंदार वृक्षाच्या मुळाजवळ कायम राहीन व यापुडे मंदार वृक्ष त्रिखंडात लोक पवित्र मानतील. मंदार वृक्षाखाली माझी मूर्ती बसवून दुर्वा व शमीपत्र जो मज अर्पण करील त्याच्या मनोकामना मी सफल करीन व भृशुंडीचा शाप खोटा ठरू नये म्हणून मी हा वर देत आहे.

म्हणून गजानन हा कायम स्वरूपात मंदार वृक्षाच्या मुळाशी असतो. म्हणून त्याला शमी आवडतात, त्याचे कारण हेच होय.

No comments:

Post a Comment