गणपती ने केले चंद्राचे गर्वहरण

Saturday, September 8, 2018

एकदा शंकर विश्रांती घेत होते. त्यावेळ गणेशाने त्यांच्या भाळावरील चंद्र अलगद काढून तो खेळायला नेला तो खेळत असताना त्या ठिकाणी मंगळासूर दैत्य डूकर होऊन गणेशाला मारण्यासाठी आला. तेव्हा गणेशाने तयाचा जबडा फाडन त्याचे दोन तुकडे केले. तोपर्यंत शंकराना जाग आली. शंकराच्या भाळावर चंद्र नव्हता. त्यांनी गणास विचारले असताना गण म्हणाले, तुमचा चंद्र तर आम्ही गणेशाकडे पाहिला. शंकराने हुकूम सोडला, आत्ताच्या आत्ता जा आणि गणेशाला माझ्यासमोर हजर करा. ते ऐकून नंदी व गण त्याला आणण्यासाठी गेले, पण गणेशाने अनेक वेळा हुकवून थकविले. त्याने अनेक रूपे दाखवून त्यांचा पराजय केला. शेवटी गणाच्या गर्वाचे हरण झाले. नंदी शंकराकडे रिकाम्या हातानेच आला, पाहतो तर काय, गणेश शंकराजवळ बसला आहे व शंकराच्या माथ्यावर चंद्र जसाच्या तसा आहे असे दिसले.

गण संकोचाने म्हणाले, अहो गौरीहरा चंद्र तर तुमच्या माथ्यावरच आहे. त्यावर शंकर स्मित करून म्हणाले, मला जाणीव आहे. परंतू तुम्हाला झालेला गर्व गणेशाकरवी नष्ट करायचा होता. यानंतर गणाचा ईश या नावाने महेश्‍वर गणेश म्हणून प्रख्यात होईल. 

असाच गर्व यमाला झाला होता. गणेश सवंगड्यामध्ये कमंडलू नदीवर आंघोळीसाठी गेला होता. त्या ठिकाणी एक दैत्य व्याघ्ररूपाने आला. त्याला पाहून सर्व मुले घाबरून पळाली. पण गणेशाने त्या राक्षसाला ठार मारले. मुले भितीने पळून जाऊन एका वृक्षाखाली निद्रिस्त झाली. त्या मुलांचे पाय दक्षिणेकडे होते म्हणून यमाने तयांना यम लोकी नेले. गणेशाने अंतर्मनी जाणले व तडक यमाकडे गेले व त्याच्यावर हल्ला करून त्याला वठणीवर आणले. यमाने सर्वांना जीवंत करून गणेशाच्या स्वाधीन केले, अशाप्रकारे श्रीगणेशाने यमाचा गर्व नाहीसा  केला.

No comments:

Post a Comment