लातूर, दि. २७ : लातूर येथील एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाला बुधवार दि. २६ सप्टेंबर रोजी नॅक (नॅशनल असेसमेंट ऍण्ड ऍक्रीडिएशन कमेटी) या शासकीय संस्थेचे बी+ (इ+) चा दर्जा प्रदान करण्यात आले आहे. नॅक बी+ (इ+) चा दर्जा प्राप्त करणारे लातूर जिल्ह्यातील एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय हे पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. नॅक दर्जा प्राप्त केल्या बद्दल संस्थेचे व महाविद्यालयाच्या टिमचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
मागील महिन्यात ह्या समितीने महाविद्यालयास भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच महाविद्यालयाची सर्वांगिण प्रगती व भविष्यातील योजनांचा ही आढावा घेतला. नॅक समितीच्या भेटी दरम्यान त्यांना संचालक, कर्मचारी, आजी, माजी विद्यार्थी व पालकांशी सखोल चर्चा करुन महाविद्यालयात उपलब्ध असणार्या सर्व शैक्षणिक सेवा सुविधांची त्यांनी पाहणी केली. समाधान कारक सेवा सुविधांच्या उपलब्धतेबद्दल समितीची शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या टिमला शुभेच्छा ही दिल्या.
एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक चे बी+ (इ+) चे मानंकन मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरअप्पा बिडवे, सचिव मन्मथप्पा लोखंडे, उपाध्यक्ष आलुरे गुरूजी, शिवशंकरप्पा खानापुरे, अभिमन्यू रासुरे, महादेवप्पा खानापुरे, विजयकुमार रेवडकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र खटोड, कॅम्पस डायरेक्टर बस्वराज धरणे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन करुन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र खटोड म्हणाले की हे सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सांघीक प्रयत्नांचे यश असून विशेषतः हे मानांकन पुढील पाच वर्षांसाठी प्राप्त झालेले असून पुढच्या फेर्यांमध्ये महाविद्यालय आजच्या पेक्षा अधिक चांगला दर्जा (ग्रेड) नक्कीच प्राप्त करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment