जे युवक जन्मदात्यांना भाजीपाला समजतात त्यांच्या जीवनाचा कडीपत्ता व्हायला वेळ लागत नाही, असे विचार ज्येष्ठ साहित्यीक ख्यातनाम कवी फ.मु.शिंदे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमा बोलताना केले. सहयोग येथे हा युवक महोत्सव संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोग संस्थेचे सचिव संतुकराव हंबर्डे होते. प्रमुख पाहूणे म्हणून राजश्री हेमंत पाटील, गुरूद्वाराचे बाबा तसेच व्यासपीठावर परमेश्वर हादवे, मुलानी, डॉ. वैजंती पाटील, डॉ. राजेश्वर दुकनाळे, बालाजी जाधव, डॉ.विश्वनाथ भरकड सह विद्यार्थ्यांच्या विविध विषयाचे प्रमुख तसेच महाविद्यालय तसेच सहयोग महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी गिरगावकर, प्राचार्य तसेच विद्यापीठाचे परिहार सर, डॉ. विश्वास हे होते.
युवक महोत्सव बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी व ज्येष्ठ साहित्यीक फ.मु.शिंदे म्हणाले की, आचार्य आत्रे हे एका दैनिकाचे संपादक होेते. व्ही.व्ही. गिरी हे राष्ट्रपती झाल्यानंतर एक फोटो आला. त्या फोटोला दुसर कोणी कॅप्शन देवू नका. मी कॅप्शन सांगणार आहे, असं आचार्य आत्रे म्हणाले. व्ही.व्ही. गिरी यांना दहा ते अकरा मुलं होती. त्यावेळा आचार्य आत्रेंनी फोटोला कॅप्शन दिले. राष्ट्रपती गिरी आणि त्यांची कामगिरी. हे सांगत असताना त्यांनी विविध विनोद सांगितले. ते एक परराष्ट्रीय माणूस भारतात आला होता. तो रस्त्यावरचे खड्डे पाहून खड्याकडे पाहतच राहिला. आणि म्हणाला भारतातील रस्ते किती छान आहेत. येथे रस्ते करताना खड्याला जोडून खड्डे करून रस्ते केले जातात. त्यानंतर आणखीण एक उदाहरण देताना त्यांनी सांगितलं दोन मित्र असतात एक मित्र दुसर्या मित्राला म्हणतो. मला खोकला खुप येतोय मी काय करू त्यावर तो त्याला सांगतो तु दारू प्यायला सुरू कर. तु रोज दारू पे म्हणजे तुझा खोकला निघुन जाईल. त्यावर दारू पिणार्या मित्राने विचारले तुला याचा अनुभव काय त्यावर सल्ला देणारा मित्र म्हणाला माझे वडील दारू प्यायचे त्यांना पाचशे एकर जमीन सोडून गेली. तुझा खोकला तर अॅटोमॅटीक जाणार.
एक विनोदी व्यक्तीमत्व त्यांनी महाविद्यालयीन फिशफॉन्डचा किस्सा सांगितला. एका विद्यार्थ्याने मला प्रश्न टाकला होता. तुम्ही बनियान का घालत नाही. त्यावर त्याला वाटले मी काही तरी वेगळे सांगेन मी उतर दिले आत एक आणि बाहेर दुसरं असं वागत नाही. आणखीन एक फिशफॉन्ड सांगितला. मनुष्याच्या अंगी चुंबकत्व असते. तर काय झाले असते. मी त्याला सांगितलं चुबकत्वाचा नियम आहे. विषम जाती जवळ येतात. असाच एक फिशफॉन्ड सांगताना फ .मु. शिंदे म्हणाले की, सर प्रेमाचे तीन टप्पे कोणते. मी त्यांना उतर दिले आमच्या काळात दोनच टप्पे होते. पहिला टप्पा म्हणजे लेटरा लेटरी, दुसरा टप्पा म्हणजे खेटरा खेटरी अशा प्रकारचे उदाहरणे देत फ.मु. शिंदे म्हणाले हंबरडे हे माझे मित्र आहेत. त्यांनी हा म्हणताच मी येतो. नाही आला तर ते हंबरडं फोडतात अशा प्रकारे फ.मु. स्टाईल त्यांनी कार्यक्रमात रंगत भरली. एक विद्याथ्याचे उदाहरणे दिले. फॉम मध्ये लिहीलेले असते. आपले नाव, वडील ऑब्लीक पालकाचे नाव त्यावर तो विद्यार्थी म्हणाला आपण वडीलांना पालक म्हणतो मग आईला शेपु का म्हणू नये त्या धागा पकडून फ.मु. शिंदे म्हणाले की, जन्मदात्यांना जे मुल भाजीपाला समजतात त्यांचा कडीपत्ता व्हायला लागत नाही. कारण कडीपाल्याचा उपयोग फक्त फोडणीसाठी असतो. जेवताना हा कडीपाला बाजुला काढून टाकतात. यावेळा फ.मु. शिंदे यांनी आई ही कविता म्हटली. आई शब्दाबद्दल बोलताना फ.मु.शिंदे म्हणाले आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर आणि आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर याचा संगम होय.
याप्रसंगी सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवक महोत्सवात शिट्या, टाळ्या, हुल्लडबाजी असावी, कुठे टाळ्या वाजवायच्या आणि कुठे शिट्टी वाजवायची हे लक्षात घ्यायला हवं. आपण युवा आहात, असं म्हणून सौ. राजश्री हेमंत पाटील म्हणाल्या युवा शब्द उलटा केला तर वायु होते. आणि युवक हा वायुसारखा असतो. युवक महोत्सवामध्ये नवचैतन्य असले पाहिजे ही देशाची गरज आहे,असंही यावेळा सौ. पाटील म्हणाल्या.
अहंकारापासून दुर रहावे
यावेळा बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सहयोग शिक्षण संस्थेचे सचिव संतुकराव हंबर्डे म्हणाले की, त्या संस्थेच्या वतीने मी सर्व विद्यार्थी, संस्थांचे टिम लिडर यांचे मनपुर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम अत्यंत आनंदाने साजरा केला. काही गैरसोयी असल्या तरी आपण त्या आनंदाने स्विकारल्या. या कॅम्पस बद्दल बोलताना संतुकराव हंबर्डे म्हणाले की, हे एक फ.मु. शिंदे सरांनी सांगितलेली गोष्ट सांगणार आहे. त्यांनी मला सांगितले होते. अहंकार फार वाईट. एक महाराज असतो झाडाखाली असून साधना करत असतो. एक छोटा मुलगा तेथे जातो तो दोन गोट्या घेऊन जातो आणि एका गोटीने दुसर्या गोटीला मारत असतो. तो मुलगा गोटीचा नेम चुकला की म्हणतो च्या मायला नेम हुकला. एकदा दोनदा झाले सांधुन त्या बालकाला सांगितले. तु असं बोलू नकोस तुला मी शाप देईन. आणि त्या मुलाने पुन्हा तीच चुक केली. तो म्हणाला हट त्याच्या आईला नेम हुकला त्यावेळा तो संत त्या बालकाला रागावून म्हणतो थांब जरा आणि देवाला प्रार्थना करतो या मुलावर वीज पडु दे याला मरू दे. वरून वीज पडते पण ती वीज संतावर पडते. आणि आवाज येतो हट तिच्या मायला नेम चुकला, असं मार्मिक उदाहरण फ.मु. शिंदे यांनी दिलं.
यावेळा विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख टिळकमाने सर यांनी युवक महोत्सवातील गुणात्मक वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाचे सर्वांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व या कार्यक्रमाच्या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणार्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. अत्यंत उत्साहाच्या आनंदी वातावरणात हा युवक महोत्सव बक्षिस वितरण सोहळा झाला. यावेळा प्राचार्य डॉ. विश्वनाथ भरकड यांनी विद्यापीठात सध्याचा युवक महोत्सव घेणारे सहयोग महाविद्यालय युवक महोत्सव झाला. पाचव्यांदा सुद्धा आम्हीच घेणार असं सांगितले. यानंतर बक्षिस वितरणाची घोषणा करण्यात आली.

No comments:
Post a Comment