साथीच्या आजारांचे शहरावर सावट

Friday, September 28, 2018

नांदेड/प्रतिनिधी - नांदेड शहर व परिसरात स्वाईन फ्लूसह, डेंग्यू व वेगवेगळया तापांची साथ पसरली असून शासकीय रूग्णालयसह खाजगी रूग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. या आजाराचा फैलाव वाढत असतांना प्रशासनाकडून मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. 

नांदेड शहर व तसेच लगतच्या हिंगेाली व वाशिम जिल्हयात डेंग्यूची साथ मोठया प्रमाणावर पसरली आहे. डेंग्यूसाठी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर हे तीन महिने पोषक मानले जातात. साचलेल्या पाण्यातून होणार्‍या या आजाराचा गेल्या काही दिवसात मोठा फैलाव झाला आहे. बदलते वातावरण आणि अस्वच्छेतेमुळे रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात आतापर्यंत 131 रक्तांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 18 जणांना डेंग्यूची लागन झाल्याची स्पष्ट झाले. शहरातल्या सिडको,हडको, देगांवचाळ, चौफाळा तसेच दत्तनगर परिसरातल्या अनेकांना डेंग्यूच्या आजाराचा विळखा पडला. 

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय रूग्णालयासह वेगवेगळया खाजगी रूग्णालयातून मोठया प्रमाणावर रूग्ण दाखल झाले आहेत. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून काल महापालिकेने शहराच्या काही भागात धूर फवारणी केली. काही ठिकाणी दुषीत पाणीही तपासण्यात आले. महापालिका हद्दीत आता जनजागृतीचे काम सुरू करण्यात आले आहेत. कोरडा दिवस पाळा, कुलरमध्ये पाणी असल्यास रिकामे करा याशिवाय स्वच्छता ठेवा असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.नांदेडसह लगतच्या हिंगोली व वाशिम जिल्हयातील रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. शासकीय यंत्रणेकडे असलेल्या रूग्णांच्या नोंदणी व प्रत्यक्षात उपचार घेणारे रूग्ण यांच्यातील संख्येत मोठी तफावत आहे. शहरातल्या अनेक खाजगी रूग्णालयात डेंग्यू, स्वाईन फ्लू तसेच व्हायरल फिव्हरचे रूग्ण मोठया प्रमाणावर आहेत. 

शहरात डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत. परंतु घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. डेंग्यू संदर्भातील तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.मनपाच्या विरोधीपक्ष नेत्या गुरूप्रितकौर सोडी यांनी महापालिका आयुक्तांना बुधवारी एक पत्र पाठवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातल्या अनेक भागात डेंग्यूचे रूग्ण आळले आहेत. त्यामुळे सत्वर प्रतिबंधात्मक उपाययोजनाक कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

ेैशहरात डेंग्यू तसेच वेगवेगळया व्हायरल फिव्हरचे रूग्ण वाढले आहेत. नांदेडसह हिंगोली, वाशिम जिल्हयातील रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. सर्दी,खोकला, ताप येणे, गंभीर डोकेदुखी डेंग्यू आजाराची लक्षणे आहेत. वातावरणात बदल झाल्याने या आजाराचा फैलाव वाढला आहे. योग्य औषधोपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा हेातो. कोणत्याही प्रकारचा ताप आला तर, खाजगी उपचार न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. पुणे तसेच औरंगाबाद येथे शिक्षणासाठी गेलेले काही विद्यार्थीही या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. आवश्यक ती काळजी घेतली आणि योग्य उपचार घेतले तर हा आजार बरा होतो. अशी माहिती आश्‍विनी हॉस्पीटलचे डॉ. रविंद्र बिलोलीकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment