लातूर :अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या राज्य आणि केंद्रातल्या भाजपा सरकारने चार वर्षात जनतेचे खिसे कापून त्यांना लुटण्याचेच काम केले आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कर्मचारी, कामगार हे सर्व वर्ग त्रस्त झाले आहेत. परिणामी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असे प्रतिपादन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
विलास साखर कारखान्याची १६ वी सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. या सभेस आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲङ श्रीपती काकडे, बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा, गोकुळ माऊली शुगरचे चेअरमन व्ही.पी.पाटील, विक्रम हिप्परकर, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, रेणा साखचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सुळ, मांजरा साखरचे संचालक जगदीश बावणे, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, माजी कार्यकारी संचालक एस.डी.बोखारे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडुसाहेब पडीले, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, जगात पेट्रोल, डिझेलचे दर कमी असताना भारतातील सरकार मात्र् ते चढ्या भावाने विकत आहे. तब्बल 12 हजार कोटी रुपये सरकारने इंधन दरवाढीनंतर कर रुपये सामान्य जनतेच्या खिशातून काढून घेतले आहेत. एकप्रकारे खिसे कापण्याचाच हा प्रकार आहे.
इंधनाचे वाढलेले दर कमी करण्याची ताकत साखर कारखान्यात आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवून ते शक्य होणार आहे. फक्त इथेनॉलचे नवे दर, साखर आणि वीज निर्मितीमुळेही सरकारला कर रुपाने मोठे उत्पन्न मिळत आहे. असे असताना सरकारचा या उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. त्यामुळे या सरकारचा दृष्टीकोन बदलण्याची अपेक्षा न ठेवता हे सरकार बदलण्यासाठीच शेतकऱ्यांनी आपली शक्ती खर्च करणे गरजेचे आहे.
लातूरचे अर्थ्शास्त्र साखर कारखान्यावर अवलंबून.
मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने उत्कृष्ट चालतात, शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव, कर्मचारी, कामगारांना नियमित चांगल्या पगारी आणि बोनस दिले जाते. वाहतूकदार, कंत्राटदार यांनाही काम मिळते या माध्यमातून वर्षभरात 5 हजार कोटी रुपये बाजारपेठेत आले आहेत. अप्रत्यक्ष उद्योग व्यवसायातून यापेक्षा अधिक रक्कम लोकांना मिळाली आहे. त्यातून लातूरची अर्थव्यवस्था चालते असे आमदार देशमुख यांनी सांगीतले.
…हेच आमच्या कुटुंबाचे संस्कार
जनतेचे सहकार्य आणि आशिर्वाद यावरच सर्वाजनिक जीवनातील आमचे अस्तित्व अवलंबून आहे. याचा विसर पडू नये अशी प्रार्थना आम्ही दररोज ईश्वरचरणी करीत असतो. आणि हेच आमचे कौटुंबिक संस्कार आणि शिकवण असल्याचे आमदार अमित विलाराव देशमुख यांनी या सभेत म्हटले. तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला.
कारखान्याकडून मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल.
सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न पाहुन मांजरा परिवातील साखर कारखान्याची उभारणी झालेली आहे. चांगले ऊसदर देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पत उंचावली आहे. शिक्षण क्षेत्रात काम सुरु आहे. परिसरातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे त्यांना माफक दरात अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून कारखान्याच्या वतीने मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येईल अशी घोषणा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली. त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
कारखाना परिसरात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या उभारण्यात येत असलेल्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय प्रशासकीय इमारत, मंगल कार्यालय, ट्रेनिंग सेंटर आदींची उभारणी कारखाना परिसरात करण्यात येत आहे. अशी माहीती यावेळी त्यांनी दिली.
मांजरा परिवारातील कारखाने म्हणजे शेतकऱ्यासाठी मंदिरे.
आमदार त्र्यबंक भिसे
मांजरा परिवारातील कारखान्यानी सहकार चळवळीला दिशादर्शक असे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रबिदू मानून काम करणाऱ्या या कारखान्यानी नेहमीच शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम केले. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून सुरू करण्यात आलेल्या मांजरा कारखान्या पासून आता मांजरा परिवार तयार झाला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे नियोजन व आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात या कठीण परिस्थितीतही उच्चांकी दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मांजरा परिवारातील कारखान्यांनी केले आहे. भागातील इतर कारखाने बंद पडत असताना मांजरा परिवारातील कारखाने नवनवीन विक्रम प्रस्तापित करीत आहेत. यामूळेच मांजरा परिवारातील कारखाने म्हणजे शेतकऱ्यासाठी मंदिरे असल्याचे गौरवदगार आमदार त्रयबंक भिसे यांनी यावेळी काढले.
सामाजिक बांधिलकी जोपासणारा मांजरा परिवार
व्हि.पी.पाटील चेअरमन, गोकूळ माऊली
मांजरा परिवाराने सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता व स्थिरता मिळवून दिली. यासोबतच आपली सामाजिक बांधीलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविले. आता यापूढे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलची उभारणी करून शेतकरी सर्वसामान्यांचे आरोग्य् सुदृढ करण्याचे काम मांजरा परिवार करीत आहे. याबद्दल मांजरा परीवाराचे कौतुक केले.
मांजरा परिवाराचा उच्चांकी भाव
मराठवाड्यात साखर क्रांती घडवून, सामान्य शेतकऱ्यांच्या जिवनात बदल घडवणाऱ्या मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांनी मागच्या गळीत हंगामात सभासदांच्या उसाला विक्रमी भाव दिला आहे, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनाबद्दल सर्वत्र कृतज्ञतेची भावना आहे, या भावनेतूनच, विलास सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख यांचा काटगाव जि.प गटातील शेतकरी सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयाचे वाचन प्रभारी कार्यकारी संचालक एस.व्हि.बारबोले यांनी केले तर अहवाल वाचन व्हा.चेअरमन गोविंद बोराडे यांनी केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात १६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सर्व विषय टाळयाच्या गजरात एकमताने मंजूर कारण्यात आले. यावेळी संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, रविंद्र काळे, चंद्रकांत टेकाळे, वलायतखाँ पठाण, जयचंद भिसे, गोवर्धन मोरे, नितीन पाटील, बालाजी साळुंके, रमेश थोरमोटे पाटील, जगदीश चोरमले, भारत आदमाने, प्रभारी कार्यकारी संचालक एस.व्ही.बारबोले यांच्यासह कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल इंगळे पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.
No comments:
Post a Comment