स्‍वच्‍छतेची सुरुवात स्‍वत:पासून करा- जि.प. अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर

Tuesday, September 25, 2018

नांदेड दि प्रतिनिधी 
स्‍वच्‍छतेसाठी शासनाच्‍या वतीने विशेष अभियान वेळोवेळी राबविल्‍या जाते. या अभियानात आपलासुध्‍दा सहभाग महत्‍वाचा ठरतो. स्‍वच्‍छतेची सुरुवात स्‍वत:पासूनच करायला हवी. एक-एक करत हजारो हात स्‍वच्‍छतेच्‍या बदलासाठी मोठे योगदान ठरणार आहे, असे मत जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी व्‍यक्‍त केले. नांदेड शहरातील शाळा-महाविद्यालयांच्‍या विद्यार्थ्‍यांनी आमच्‍या हाकेला प्रतिसाद देत स्‍वच्‍छता जनजागृती रॅलीत मोठया संख्‍येने उपस्थित झाल्‍याबद्ल त्‍यांनी सहभागी सर्व शाळा- महाविद्यालयाचे स्‍वागत करुन आभार व्‍यक्‍त केले.

स्‍वच्‍छतेच्‍या‍ विविध घोषवाक्‍यांनी लक्ष वेधले
स्‍वच्‍छता जनजागृती रॅलीत मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या विविध घोषवाक्‍यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. गांधीजी का इरादा, देशवासी करें स्‍वच्‍छता का वादा, स्‍वच्‍छता का रखिए ध्‍यान, स्‍वच्‍छता से देश बनेगा महान, सांडपाण्‍याची योग्‍य विल्‍हेवाट, गावात येर्इल आरोग्‍याची पहाट, एकत्र करुनी कचरा, कंपोष्‍ट खड्डयात करु निचरा, गावकरी मिळून काम करु शौचालयाचा नियमित वापर करु, स्‍वच्‍छतेचे संदेश ध्‍यानी धरु, आरोग्‍य आपले निरोगी बनवू अशा विविध घोषवाक्‍यांची फलक आणि घोषणेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीत यशवंत महाविद्यालय, पिपल्‍स कॉलेज, सायन्‍स कॉलेज, आय.टी.एम. कॉलेज, अशोक माध्‍यमिक विद्यालय, अंध्रा समिती विद्यालय, पिपल्‍स हायस्‍कुल, के.आर.एम. महिला महाविद्यालय, महात्‍मा फुले हायस्‍कुल बाबानगर, जिल्‍हा परिषद हायस्‍कुल मुलांचे वजीराबाद, श्री शारदा भवन हायस्‍कूल, गुजराथी हायस्‍कुल, फजोलुउलूम हायस्‍कूल, अंबिका विद्यालय, नोबल हायस्‍कूल, खालसा हायस्‍कुल, शासकिय आद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शासकीय तंत्रनिकेतन, विधी महाविद्यालय, जिल्‍हा नांदेड स्‍काऊड गाईड कार्यालयाचे स्‍काऊड आणि गाईड, जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्ष, तालुकास्‍तरावरील समन्‍वय व समुह समन्‍वय यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

पथनाटय व कलापथकाचे आकर्षण
स्‍वच्‍छता रॅली दरम्‍यान शाहीर रमेश गीरी व शाहिर अप्‍पासाहेब उगले आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी कलाथकाच्‍या माध्‍यमातून स्‍वच्‍छतेची गीते सादर केली. स्‍वच्‍छ झाल्‍यावर आमचं गाव मालदार झाल्‍या सारखं वाटतंय...., घरी शौचालय असेल छान, बाहेर का करता घाण आदी गीतांमधून स्‍वच्‍छतेचा संदेश दिला तर सायन्‍स कॉलेजच्‍या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्‍यांनी स्‍वच्‍छतेवर पथनाटय सादर केले.

No comments:

Post a Comment