घनकचरा व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचा पुढाकार महत्वाचा : विक्रांत गोजमगुंडे

Wednesday, September 26, 2018

दयानंद वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती कार्यक्रम 

लातूर : दिवसेंदिवस पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून, पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज बनली आहे. घनकचरा व्यवस्थापन या कार्यात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लातूर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी येथे बोलताना केले.


येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात 'स्वच्छता हीच सेवा' या कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रीन प्रॅक्टिसेस सेलच्या वतीने पर्यावरण जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. पारंपरिक पद्धतीला फाटा देत वृक्षाला जल अर्पण करून अनोख्या पद्धतीने या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ. राजाराम पवार होते. मंचावर डॉ. अंकुशकुमार चव्हाण, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे, ग्रीन प्रॅक्टिसेस सेलच्या प्रमुख प्रा. मनिषा अष्टेकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना विक्रांत गोजमगुंडे म्हणाले, इच्छाशक्ती असल्यास काहीही करणे शक्य आहे. लातूरच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये पर्यावरण बाबतीत अनेक प्रकल्प आम्ही हाती घेऊन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज असून, तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. मुलींनी आणि महिलांनी या कार्यात पुढे आल्यास आणखी व्यापक पद्धतीने काम होईल, असे ते म्हणाले. 

पाहुण्यांचा परिचय रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीषा अष्टेकर यांनी करून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ. राजाराम पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत फड, कु. प्रतीक्षा आगलावे यांनी तर आभार प्रा. राहुल डोंबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ओम जाधव, प्रा. आकांक्षा भांजी, प्रा. योगेश शर्मा, प्रा. प्रेमसागर मुंदडा, प्रा. अंकिता परांडेकर, प्रा. श्रीकांत पंड्या, प्रा. स्वप्नाली माणिकशेट्टी, कुणाल चालिकवार, अतिश तिवारी, ऋषिकेश भोसीकर, सुधीर सूर्यवंशी, प्रणिता कदम, भाग्यश्री उफाडे, कीर्ती शर्मा, तेजस्विनी दीक्षित, नामदेव काकडे, सागर कडेल, अंकिता तारे आदींनी परिश्रम घेतले. कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक मध्ये देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती. प्रसिद्धि प्रमुख डॉ साईनाथ उमाटे दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर

No comments:

Post a Comment