रमाई आंबेडकर स्त्री रुग्नालय नामकरण एकदिवसीय धरणे आंदोलनास अभूतपूर्व प्रतिसाद

Wednesday, September 26, 2018

आ.अमित देशमुखांसह सर्व पक्ष संघटनांनी उपस्थीत राहून दिला पांठिबा


लातूर दि - 
त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव लातूर मधील लेबर कॉलनी येथील मनपा स्त्री रुग्णालय ला देण्यात यावे यासाठी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर महानगरपालिकेत मागणी केली होती. सगळ्या विषयांना मनपा सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येते परंतु त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या नावाला दूर केल जात आहे व त्यावर साधी चर्चा देखील होत नाही हि भावना सर्व आंबेडकरवादी विचारांच्या नागरीकांची झालेली आहे.

 ही मागणी कोण्या एका व्यक्तीची नाही तर तमाम समाजाची आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वांची आहे. यामुळे ही मागणी डावलण्याचे काहीही कारण नसताना मनपातील मागील सहा महीन्यापासून सत्ताधारी याबाबत टाळाटाळ करीत आहेत. ही मागणी मान्य व्हावी यासाठीच दिनांक २५ सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले . यामध्ये सर्व संघटना, पक्षाची मंडळी उपस्थित होती. या मागणी आणी आंदोलनाची दखल घेत येता 15 दिवसा मध्ये महानगरपालिकेची ‍विषेश सभा बोलावून ही मागणी तात्काळ मान्य करावी अन्यथा पूढील काळात या मागणी साठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला.

आपण सर्वजण या आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या एकदिवसीय धरणे आंदोलनात प्रथमच लातूरातील आंबेडकरवादी विचारांचे सर्व नेते कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सर्व पक्ष, संघटनांचे पांठीबा पत्र आंदोलन स्थळी तीन मुली स्वीकारत होत्या. आंदोलनाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करुन करण्यात आला. यावेळी महिलांची संख्या सर्वाधिक होती. आंदोलनानंतर महापौर यांना निवेदन देण्यास गेले असता महापौर उपस्थीत नसल्याने निवेदन त्यांच्या कक्षाच्या दारास अडकविण्यात आले व उपायुक्त यांना याची प्रत देण्यात आली निवेदनावर उपस्थीतांच्या व शेकडो नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत

या आंदोलनास आ.अमित देशमुख यांच्यासह विक्रांत गोजमगुंडे, चाँदपाशा घावटी, लक्ष्मण कांबळे, डॉ.खय्युम खान, सचिन मस्के, रघुनाथ बनसोडे, प्रा.युवराज धसवाडीकर, अफजल कुरेशी, दिपक सुळ, राहूल माकनीकर, ललीतभाई शहा,उषा कांबळे, कांचन अजनीकर, आयुब मणियार, कैलास कांबळे, युनूस मोमीन, गौरव काथवटे, सुभाष पंचाक्षरी, दिप्ती खंडागळे, दत्ता मस्के, चंदु बिराजदार, गोरोबा लोखंडे, अहमदखॉ पठाण, अमोल लांडगे, राजा मणियार, प्रदिप गंगणे, रघुनाथ मदने, मोईज शेख, सुरज राजे, कुणाल श्रंगारे, यशपाल कांबळे, राहूल डूमणे, लाला सुरवसे, हिराचंद सितापुरे, सोमेन वाघमारे,‍ अङ सचिन कांबळे, प्रविण कांबळे, सोमेन वाघमारे, शिवाजी शिरसाठ, हनमंत जाकते, सुरेश वाघमारे, रुपेश गायकवाड, कांचन वाघमारे, गौतम सोनवणे, उत्तम कांबळे, , उमेश कांबळे, सिद्धार्थ सुर्यवंशी, साधु गायकवाड, मंगेश सोनकांबळे, भैयासाहेब वाघमारे, नवनाथ आल्टे, सुनिल बसपुरे, प्रविण सुर्यवंशी, मुस्तकीन सय्यद, राम गोरड, कुनाल वागल, जफर नाना, सुनिल सौदागर, चंद्रकांत चिकटे, केशव कांबळे, विशाल चामे, अशोक देडे, दिलीप सोनकांबळे, जाकेर शेख, राहूल कांबळे, बाबा गायकवाड, जावेद मणियार, ताहेर सौदागर, धम्मदीप बलांडे, महेश ढोबळे, ओमकार सोनवणे, सुरेखा कारेपुरकर, महेंद्र बनसोडे, गणेश गायकवाड, राजू गवळी, श्रीहरी कांबळे, विमलबाई डुमणे, गंगूबाई गायकवाड, सुमनताई गायकवाड, सुकूमार सुरवसे, मोहन मोरे, विलास केदार, रईस टाके, देवीदास बोरुळे, बरकत काजी, जी.ए.गायकवाड, रघूनाथ कुचेकर, आनंद वैरागे, एम.पी.देशमुख, खाजामियाँ शेख, निलेश ‍ शिरसाठ, विशाल वाहूळे, अड.अजय कलशेट्टी, निखील उडाणसिंह, सुनिता उबाळे, रेखा लांडगे, कमलाकर सुरवसे, शास्त्री चव्हाण, रुपेश गायकवाड, जय ढगे, रत्नदीप अजनीकर, सुमित खंडागळे.

यासह आम आदमी पार्टी, एम आय एम, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहूजन समाजवादी पार्टी, भारीप बहूजन महासंघ, मनसे या पक्षासंह ग्रीन टायगर संघटना, युथ पँथर संघटना, भिमराज संघटना, व्ही.एस.पँथर संघटना, एम.एस कपनी, लष्कर ए-भीमा,वाल्मीकी संघटना, भारत मुक्ती मोर्चा, रीप्बलीकन सेना, पँथर संघर्ष, ब्ल्यु फोर्स, ब्ल्यु पँथर, पँथर ग्रुप, भिम युवा संघटना, उपस्थीत राहून पांठीबा दर्शविला. .

No comments:

Post a Comment