व्हॉट्सअॅप समोर केंद्र सरकारच्या तीन अटी

Tuesday, August 21, 2018


 फेक न्यूज रोखण्यासाठी ठोस उपाय शोधा व्हॉट्सअॅप सीईओना सूचना 
नवी दिल्ली : फेक न्युज  आणि अफवा रोखण्यासाठी ठोस उपाय शोधा अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी वॉट्स ऍप चे  सीईओ ख्रिस डॅनिअल यांच्या कडे केल्या आहेत. 

वॉट्स ऍप चे  सीईओ ख्रिस डॅनिअल यांनी मंगळवारी रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली वॉट्स ऍप द्वारे खोट्या बातम्या व्हायरल झाल्या मुळे देशात अनेक घटना घडत आहेत या खोट्या बातम्यांचा  स्त्रोत शोधण्यासाठी लवकरात लवकर पाऊले उचला अफवा , पॉर्न , खोट्या बातम्या या सर्वाना आळा घालण्यासाठी तांत्रिक उपाय शोधा या शिवाय भारतात व्हाट्स अप चा वाढता  वापर लक्षात घेता भारतात व्हॉट्सअॅप ची स्थानिक कंपनी स्थापन करण्यात यावी व्हॉट्सअॅप न भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेत  महत्वाचे योगदान दिले असले तरी फेक न्युज आणि अफवा रोखण्यासाठी व्हायरल झालेल्या मेसेज किंवा व्हिडीओ चा स्त्रोत ओळखता यावा असे फिचर तयार करावं अशा तीन मुख्य अटी डॅनिअल यांच्या समोर ठेवण्यात आल्या आहेत 

अफवा मुळे सामाजिक शांतता भंग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने काही बदल केले आहेत त्या पैकी १ म्हणजे व्हॉट्सअॅप युझर एकाच वेळी ५ पेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाहीत तसेच फॉरवर्ड मेसेज ओळखता हि येतात 
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment