हिंगोली : प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांकडून ऑनलाईन पध्दतीने बदलीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील एकुण २३४६ शिक्षकांपैकी तब्बल १४५२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. असे आदेश सोमवारी (दि.२८) प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिले आहेत.
यावेळी ऑनलाईन अर्ज करतांना शिक्षकांना पसंतीक्रमानुसार वीस शाळांची निवड करावयाची होती. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यावरून सोमवारी (दि.२८) शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये औंढा नागनाथ-२५२, वसमत-३१७, हिंगोली-३३१, कळमनुरी-३१९ तर सेनगाव-२३३ असे एकुण १४५२ शिक्षकांच्या जिल्ह्यातर्ंगत बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदल्या न झालेले विस्थापीत शिक्षकांनी दोन दिवसात ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून २० शाळा पसंतीक्रमानुसार नोंदवाव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शिक्षकांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. अशांना सोमवारीच कार्यमुक्त करण्यात आले असून बदलीच्या मंगळवारी पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुर्वी शिक्षकांनाच शिक्षण विभागाकडे वारंवार बदली करण्यासाठी अर्ज, निवेदने केली जात होती. मात्र गेल्या काही वर्षापासून यापासून शिक्षकांची सुटका झाली आहे. दरवर्षी ज्यांना बदली घ्यावयाची आहे अशांंकडून शिक्षण विभाग ऑनलाईन पध्दतीने बदली केली जात आहे. यंदा एकुण २३४६ शिक्षक बदलीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. पैकी १४५२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बदलीसाठी प्राथमिक शिक्षक १९२४ पात्र ठरले होते. पैकी १२१९ बदल्या मिळाल्या. प्राथमिक पदवीधर २४३ पात्र ठरले पैकी १४७ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तर मुख्याध्यापक १७९ पात्र ठरले होते पैकी ८६ बदल्या झाल्या आहेत. तर अजून पात्र विस्थापित शिक्षकांपैकी अजून ३७० जणांच्या बदल्या करणे बाकी आहे. असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सोमवारी काढले आहेत.

No comments:
Post a Comment