तुळजाभवानी देवीस अकरा किलो चांदीची मुर्ती व सोन्याचे अलंकार अर्पण

Tuesday, July 17, 2018

तुळजापुर- प्रतिनिधी
नवसाला पावणारी तुळजापुरची तुळजाभवानी देवीला अर्पण होणाया सोन्या चांदीच्या वाहिकात गेल्या चार वर्षात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी पुण्यातील सुवर्णकार माजी महापौर कैलास भांभुर्डकर यांनी देवीस एकाच वेळी पाच श्रीखींडाच्या सिंहासन पुजा,  अकरा किलो चांदीची मुर्ती, तीन तोळे सोन्याचे अलंकार अर्पण केले.



पुणे येथील सुवर्णकार मंडळींनी आपली मनोकामना पुर्ण झाल बददल देवीला चांदीची मुर्ती व सोन्याचे छोटे अलंकार अर्पण केले. तुळजापुरचे नगराध्यक्ष बापुसाहेब कने व तहसिलदार राहुल पाटील यचंनी त्यांच्या दानशुरपणाबददल व निस्सिम भक्तीबददल शाल देवुन सत्कार केला. देवीचे भोपे पुजारी बुबासाहेब पाटील यांनी त्यांची विधिवत सिंहासन पुजा केली. गेल्या बारा वर्षापासुन कैलास भार्भुर्डे व सहकारी देवीची महापुजा व दान करतात. अत्यत श्रध्देने ही मंडळी देवीची सेवा करतात अशी प्रतिक्रिया बुबासाहेब पाटील यांनी दिली, याचे पुजारीपण करताना मलाही कृतार्थतेचा अनुभव होतो असेही ते म्हणाले.

चांदी मुर्ती सिंहासनार बसवुन पुणे सुवर्णकार मंडळींनी मुर्तीची छञपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन वाजत गाजत मिरवणुक काढली. भगवे फेटे, भगवे शर्ट परिधान केलेले पदाधिकारी व भगव्या साडया नेसलेल्या महिलांनी मिवणुकीत देवीच्या भक्ती न्हानून नृत्य केले. माजी आमदार अनुसया खेडकर, सराफ संघटना राज्य अध्यक्ष सुधाकर धानोरकर, माजी महापौर कैलास भाभुर्डेकर, सुधाकर भाभुर्डेकर, राजेंद्र डहाळे, अनिल आष्ठेकर, नगराध्यक्ष बापुसाहेब कने, नगरसेवक सचिन रोचकरी, युवा नेते आनंद कंदले, मंगेश लोळगे, प्रशांत गेवरीकर, दिलीपसेठ भाभुर्डेकर, शाम कपोले, दिपक शहाणे,मधुकर टाक, विठठल मुंडलिक,माधव दैवाळ, राजेद्र आष्ठेकर, गणेश आष्ठेकर, जीवन पोतदार यांनी शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. 

वाजत गाजत मिरवणुकीने मंदिरात सकाळी पाच श्रीखंडाचे सिंहासन भरण्यात आली. विधिवत महापुजा झाल्यानंतर केलास भाभुर्डेकर व मान्यवरांना पुजारी बूबासाहेब पाटील यांनी आशीर्वाद दिला. मंदिराचे तहसिलदार राहुल पाटील, व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी सत्कार केला.


No comments:

Post a Comment