लातूरःप्रतिनिधी
१६-०७२०१८ :इंद्रप्रस्थ जलभुमी अभियाना अंतर्गत राबविण्यात येणार्या एक घर एक झाड या योजनेचा शुभारंभ नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रभाग क्रमांक १८ मधुन करण्यात आला . या अंतर्गत प्रभागातील नागरिकांना १५०० झाडांचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी आपल्या प्रभागातील कचर्यापासुन तयार केलेला खत यावेळी झाडासोबत देण्यात आला .
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबविण्यात आले. त्या दरम्यान पालकमंत्री व राज्याच्या वनमंत्र्यांनी प्रत्येक घरात एक झाड लावण्याची योजना राबविण्याची घोषणा केली होती त्याअंतर्गत महापौर सुरेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ झाला. अजित पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी प्रभागातील कचर्या पासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता.
या प्रकल्पात तयार झालेला खत आणि प्रभागातील प्रत्येक घरासाठी एक याप्रमाणे १५०० झाडांचे वाटप यावेळी करण्यात आले. मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. उपस्थित मान्यवरांसह नगरसेवक अजित पाटील यांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत ही योजना गतिमान करण्याची अपेक्षा व्यक्त केली. उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे ,भा.ज.पा.जिल्हासरचिटणिस शिरीष कुलकर्णि, जफर पटेल,समन्वयक निलकंठराव पवार, संभाजीराव पाटील,नगरसेवक चंद्रकांत बिराजदार,नगरसेविका रागिनी यादव, भाग्यश्री शेलके, सरिता राजगिरे,श्वेता लोंढे,शोभा पाटील ,वैशाली यादव, वर्षा कुलकर्णि,स्वाती घोरपडे, माजी नगरसेवक गोरोबा गाडेकर,शाखा अभियंता काझी साहेब,स्वामी साहेब,कुलकर्णि साहेब,अकरम शेख,मुख्याध्यापक गोविंद शिंदे सर, बिराजदार सर,आदींची यावेळी उपस्थिती होती
पालकमंत्र्यां नी दिलेल्या हाकेला ओ देत पालिका आणि प्रभागातील नागरिकांच्या सहकार्यातुन घरोघर वृक्ष लागवड होत आहे त्यामुळे पालकमंत्र्यां च्या संकल्पनेनुसार लवकरच लातुर शहर हरित होणार आहे
No comments:
Post a Comment