गुणवंतांच्या जिद्दीला पालकमंत्र्यांची साथ

Tuesday, July 17, 2018

लातूरःप्रतिनिधी
शहर हे गुणवंतांची  खान आहे ह्याच लातूर पॅटर्नने देशात लातूरची वेगळी ओळख निर्माण केली आहे . लातूर मध्ये असलेल्या गुणवंतांचा खाणीत काही अडचणी मुळे  गुणवंत विध्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचीत राहत आहेत . मात्र काही जण जिद्द व कष्ठातून शिक्षण पूर्ण करत आहेत या गुणवंतांच्या  जिद्दीला आता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची साथ लाभणार आहे . याचाच एक भाग म्हणून कष्ठं व  जिद्दीतून १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण करणार्या भक्ती बिडवे ला पालकमंत्री यांनी लॅपटॉपची भेट देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी पालकमंत्री निलंगेकरांनी लवकरच जिल्हयातील गुणवंत असलेल्या गरजवंत  विद्यार्थिनीसाठी योजना सुरु करण्याची घोषणा केली . 

लातूर जिल्ह्यात कष्ठ आणि जिद्दीतून शिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे . यातील अनेक गुणवंत विध्यार्थ्यांना  मात्र अडचणी मुळे  पुढील शिक्षण पूर्ण करणे  अशक्य होते . मात्र अडचणींवर मात  करत लातूर शहरातील भक्ती बिडवे हिने १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे . भक्तीने १० वीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण घेतले आहेत . पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला मदत आवश्यक आहे हि बाब ओळखून पालकमंत्री निलंगेकर यांनी तिला बळ दिले आहे . शहरातील देशपांडे गल्लीत राहणार्या भक्ती बिडवे हिच्या घरी भेट देऊन तिला लॅपटॉपची भेट दिली आहे . तसेच पुढील  शिक्षणास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे . 

यावेळी पालकमंत्री निलंगेकरांनी गुणवंत असलेल्या गरजू विद्यार्थिनीसाठी स्वातंत्र्य  दिनापासून नवीन योजना सुरु करण्याचे जाहीर केले आहे . यासाठी एक वेबसाईड  सुरु करण्यात येत  असुन त्या वेबसाईटवर गरजवंत  विद्यार्थिनी नी  नोंदणी केल्या नंतर त्यांना आवश्यक ती मदत दिली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री निलंगेकरांनी केली आहे . यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी , महापौर सुरेश पवार , उपमहपौर देविदास काळे , स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे , नगर सेवक दीपक मठपती , मनोज सूर्यवंशी , ज्ञानेश्वर चेवले आदींची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment