साडेचार हजार वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा!
निलंगा:प्रतिनिधी
निलंगा शहरांत गतवर्षी लावलेल्या साडे चार हजार झाडांचा पहिला वाढदिवस युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते केक कापवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना अरविंद पाटील म्हणाले की, गतवर्षी लावलेल्या झाडे अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासले आहेत. आणि यावर्षी१६०००हजार वृक्ष लागवाडीचा निर्धर आहे.वीस हजार पाचशे झाडे निलंगा शहरांत होणार आहेत. निवडणुकीत दिलेले अभिवनचना प्रमाणे निलंगा शहर हरित सुंदर बनवून महाराष्ट्रात एक मॉंडल शहर बनणार आहे असे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले.
दिनांक:१६ जुलै रोजी निलंगा येथील जिजाऊ चौकात गतवर्षी लावलेल्या साडेचार हजार झाडांचा केक कापवून वाढदिवस साजरा करण्यात आला.त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने१३’५०कोटी वृक्ष लागवडीचा घेतलेल्या निर्णयाचा अनुषणगाने निलंगा नगर पालिकेने शहरांत सोळा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतलेला असून या सोळा हजार वृक्षा मध्ये ३७ जातीचे वृक्ष आहेत यामध्ये नारळ,रायल पाम, अरिका पाम, बांबू, बकुळ,मोह मनी, कांचन, उदंब, अशोका, शँकासूर, गुलमोहर, गिलमोहर, वड, पिंपळ,लिंब,अवळा,चिंच, जांभूळ, सोनचापा, ट्रॅव्हलर, टेम्पल फ्री, कोनॉकारफोस, टनूबिया, चायना बदाम, रेन ट्री, कोशिया पिनारा, कार्तिया सबस्टीमिनीया, त्याचबरोबर अशी छत्तीस जातीचे झाडे आहेत. त्याचबरोबर २९ जातीच्या शोभेवन्त फुलांचे झाडे यात लेडीज स्टोरीमिया, जट्रोफा, रातराणी, कामिनी, बोगणवेली, चममापुरीका, स्वस्तिक, नंदी, कलर रोमिया, रोटण, महात्मा, पेंडनस,स्पायडर बिली, एक्झोरा, मुसांडा, कनेर, पारिजातक, अर्पिलीला,पटकरिया, टीकोमा,गावडी, चावडी, बिट्टी कनेर, गोल्डन दुरानटा,लयांटिना, अलमेरा, व्हरबेना, खुलिया, मिनीचर एकझोटा, मिनीचर स्वॅस्तिक, वडेलीरिया, अशे एकूण२९जातीचे शोभेचे झाडे आहेत.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे शुभारंभ युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रांगणात झाडे लावून करण्यात आला त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे वृक्ष लागवड करण्यात आली व इंदिरा कन्या शाळेच्या समोरील नगर परिषद च्या खुल्या जागेत ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जातीच्या झाडांचा नारळ फोडून झाडांचे पूजन युवा नेते यांच्या हस्ते करण्यात आले.त्या झाडांचे वर्गवारी करून कोणत्या जातीचे झाड शहरांतील कोणत्या भागात लावायचे हे वृक्ष तज्ञानाच्या सोबत चर्चा करून ठरविण्यात आले.
यावेळी बोलताना निलंगेकर म्हणाले कीमहाराष्ट्र शासनाच्या१३५०५०कोटी वृक्ष लागवडीचा निर्णयाचा स्वागत निलंगा नगर परिषदेणे स्वीकारले असून शासनाच्या योजनेचा लाभ निलंगा वासीयांना होणार असून नगर पालिके बरोबर नागरिकांनी वृक्षाचा संगोपन करणे आजच्या काळाची गरज आहे. या योजनेमध्ये लोक सहभाग महत्वाचा असून शहरांतील प्रत्येक नागरिकांनी आपले नैतिक कर्तव्य म्हणून व शहराच्या सुंदरतेची जबाबदारी स्वीकारून प्रत्येकांनी झाडांची लागवड करत त्याचे संगोपन करावे.त्याचबरोबर गतवर्षी लावलेल्या साडेचार हजार वृक्षाचे नगर परिषद व शहरांतील नागरिकांनी चांगले संगोपन केले आहे या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे आज निलंगा शहराला हरित स्वरूप येत आहे. त्याचबरोबर यावर्षी लावण्यात येणारे सोळा हजार वृक्षामुळे निलंगा शहर महाराष्ट्रात हरित व सुंदर होणार असल्याचे विश्वास युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरीचे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे, उपविभागीय अधिकारी डॉ, भवानजी आगे,तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाळ राजनकर,पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर,शेषेराव मममाळे,उपनगराध्यक्ष मनोज कोळळे, मुख्याधिकारी मालिकार्जुन पाटील,पंचायत समितीचे सभापती अजित माने, नगर परिषद सभापती भगवान कांबळे, शरद पेठकर, सुमनताई हडोळे, माजी सभापती इरफान सय्यद, हरिभाऊ कांबळे, शफिक सौदागर, नगरसेवक पिंटू प्रदीप पाटील,महादेव फत्टे,शँकर अप्पा भुरके,स्मिता ताई देशपांडे,संपता ताई नाटकर,विष्णू ढेरे,भाजपचे शहर अध्यक्ष संजू सुभेदार, खदिर मासुलदार, सुमित इनानी,संदीप वाजीरे,तम्मा माडी बोयणे,नबी सौदागर,अय्युब शेख,आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment