मुंबई ः प्रतिनिधी
दुधाच्या भावासंदर्भात केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दैनिक मराठवाडा नेताशी बोलतांना दिली. व आज दिल्ली येथे ना.गडकरी साहेब यांनी बैठक बोलावली असून या बैठकीचे मला निमंत्रण आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दुधाच्या भावासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाच रुपये प्रतिलिटर शेतकर्याच्या खात्यावर जमा करा अशी मागणी केली आहे, हे आम्हालाही मान्य आहे. मुख्यमंत्र्यांनी दुधाच्या दरासंदर्भात सल्लागार समिती नेमली व चर्चा करण्याचे मला अधिकार दिले, असे सांगून पाशा पटेल म्हणाले की, या संदर्भार्त बैठक घेतली, त्यावेळी शंभर सदस्य उपस्थित होते. त्यावेळी असे ठरले की दहा लोकांची समिती करायची.
पाच सहकारी आणि पाच खाजगी दुध संघाचे प्रतिनिधी घ्यायचे. या संदर्भात चर्चा करुन अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. केंद्र सरकारने दुग्धजन्य उपपदार्थ झिरो टक्के निर्यात ड्युटीवरुन १० टक्के निर्यात ड्युटी केल्याचे मान्य केले, ही सवलत ५ जानेवारी २०१९ पर्यंत देण्याचे ठरले. राज्य सरकारने एक किलो पावडरला निर्यातीसाठी पन्नास रुपये अनुदान द्यायचे ठरवले. पाच रुपये दुध निर्यातीला अनुदान द्यायचे ठरले
तसेच शालेय पोषण आहारात दुग्धजन्य पदार्थ वापरायचे ठरले. तुप आणि लोण्याला १२ टक्के जीएसटी आहे. जी एका किलोला ४८ रुपये पडते. केंद्र सरकारला पत्र लिहून हा कर ० ते ५ टक्के करायचे ठरले. तसेच युरोपीयन राष्ट्रातून औषधासाठी आणले जाणारे दुधाचे पावडर याच्या औषधी उपयोगाऐवजी दुधासाठी वापर होऊ लागला. यामुळे २० टक्के अनाधिकृत दुध बाजारात आले.
यावर १०० टक्के आयात शुल्क लावण्याचा विचार करण्यात आला. १ ऑगस्टला १ रुपये व १ रुपया १५ ऑगस्टला असे वेगवेगळ्या पद्धतीने पाच रुपये देण्याचे ठरले. निवडणूकीचे वर्ष ठरल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मागण्या मान्य होऊनसुद्धा आंदोलन केले जात आहे. केंद्र सरकारने गडकरी साहेबांच्या नेतृत्वात उद्या बैठक ठेवली आहे आणि गडकरी साहेबांनी या बैठकीस बोलावल्यामुळे मी उद्या सकाळी दिल्लीला जात असल्याचे संागून पाशा पटेल म्हणाले की, दुधाच्या प्रश्नासाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे.
No comments:
Post a Comment