विनायकराव पाटलाची जादूची काडी चालली

Tuesday, July 17, 2018
अहमदपूर न. प.  चे वादळ शमले 
अहमदपूर : येथील नगरपरिषदेच्या दोन विषय सभापती आणि इतर ५ सदस्यांनी राजीनामे दिले होते आ विनायकराव पाटील यांची जादूची कांडी चालली व सर्वच्या सर्व नगरसेवकांनी आपले राजीनामे परत घेतले आहेत . आ विनायकराव पाटील यांनी सर्व नगरसेवकांना भेटून त्याचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्याशी  सकारात्मक चर्चा केल्या नंतर त्या नगरसेवकांनी   राजीनामे माघारी  घेतल्याचे सांगण्यात आले त्यातून अहमदपूर नगर पालिकेत निर्माण झालेले राजकीय वादळ शमले असल्याचे बोलले जात आहे .  

अहमदपूर मतदार संघात जाणीवपूर्वक आ विनायकराव पाटील यांना कोंडीत पकडण्यासाठी काही झारीतील शुक्राचार्यांनी गेल्या आठवड्यात नगरसेवकांना राजीनामे द्यायला लावून अडचणीत आणण्याचा  प्रयत्न केला गेला पण राजकारणात मुत्सद्दी व संयमी शांत स्वभावाचे आ विनायकराव पाटील यांनी गनिमी कावा पद्धतींनीने  सर्वच्या सर्व नगरसेवकाची समज काढली . या खेळीने आ. विनायकराव पाटील यांच्या विरोधकांचे मनसुबे उधळण्यात यश आले आहे . 

कासनाळे जरा संभालकें 
नगराध्यक्ष चे पती लक्ष्मीकांत कासनाळे आपण स्वीकृत नगर सेवक आहोत आपण जरी नगराध्यक्ष पती असलात तरी आपण आपल्या मर्यादा ओळखुन राहावे व नगर परिषदेच्या कारभारात लुडबुड करू नये असे पण लोक बोलत आहेत 

No comments:

Post a Comment