दीडशे कोटींची स्थायी सभा ठरणार लक्षवेधी

Tuesday, July 17, 2018
नुतन अध्यक्ष शैलैश गोजमगुंडे पहिलीच सभा कशी हाताळणार?

अजय आसोपा
लातूर ः लातूर शहर मनपाच्या स्थायी समितीची सभा तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर आज मंगळवारी आयोजित केली आहे. सभापती निवडीवरूणन न्यायालयीन प्रक्रिया अन् त्या अनुषंगाने वादाच्या भोवर्यात सापडलेलया स्थायी समितीने जवळपास दीडशे कोटींच्या कामाचे निविदा ठराव आज होणार्या सभेत ठेवले आहेत. महापौरांच्या कारभाराबाबत असणारा असंतोष, सताधारी भाजपच्या नगरसेवकांतील परस्पर बेबनाव, गटबाजीच्या पार्श्‍वभुमीवर अभ्यासू, हुशार, विधीज्ञ असलेले सभापती ऍड. शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात होणारी पहिलीच स्थायी सभा कशाप्रकारे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आज होणार्या मनपाच्या स्थायी समिती सभेत अजेंड्यावर प्रामुख्याने अर्थपुर्ण व्यवहारांचा समावेश आहे. केंद्र शान पुरस्कृत अमृत अभियाना अंतर्गत लातूर शहर मलनिस्सारण प्रकल्पाची १३९ कोटींची निविदा, अमृत अभियाना अंतर्गत लातूर शहर पाणी पुरवठा प्रकल्प यांत्रिकी कामे प्राप्त निविदा अंदाजे ५.५ कोटी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्राप्त ३.५ कोटींची निविदा. याशिवाय अमृत योजनेतील अतिरीक्त बाब क्र. १ आणि वाढीव परिणामांचा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

एक अभ्यासू, हुशार, विधीज्ञ म्हणून परिचय असणारे सभापती ऍड. शैलेश गोजमगुंडे आजची सभा कशाप्रकारे हाताळणारे कोट्यावधीच्या विकास कामाचे टेंडर असे मांडणार अर्थपुर्ण व्यवहाराबाबत कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पदावर नसतातना असलेली आक्रमकता वेगळी आणि पदावर असताना आक्रमकतेसोबत सामंजस्थायी भुमिका त्यांना घ्यावी लागणार आहे.

नगरसेवकांत नाराजी 
केंद्रात आणि राज्यात सताधारी असणार्या भाजपकडे लातूरकरांनी मोठ्या अपेक्षेने मनपाची सुत्रे दिली. परंतू, नागरीकांना दिवाबती, स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे अशा मुलभुत सुविधा पुरविण्यात सुद्धा अपयशी ठरलेल्या महापौर सुरेश पवार यांच्या कारभारावर सताधारी भाजपातीलच बहुतांश नगरसेवक नाराज आहेत. बुधवारी होणार्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभुमीवर रविवारी भाजप नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. नाराजीच्या पार्श्‍वभुमीवर अनेक नगरसेवकांनी त्या बैठकीकडे पाठ ङ्गिरविली. प्रभागातील कामेच होत नसल्याने अनेक नगरसेवक नाराज आहेत. त्यांची नारजी कशी दुर करणार

आकडा मकडा लिम लिम ककडा 
कें द्रात आणि राज्यात भाजपा सतेवर आल्याने लातूर शहर मनपामार्ङ्गत कोट्यावधी विकास कामे मंजूर होत आहेत. सर्वच नगरसेवकांची त्या कोट्यावधींच्या आकड्यावर नजर आहे. परंतू, याच आकड्यावरून नाराज, संतप् असणार्या नगरसेवकांवर आकडा-मकडा लिंब लिंब ककडा करण्याची मदत निर्माण झाली आहे.




पाठक हायकोर्टात 
लातूर शहर मनपाने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभा ह्या विधीग्राह्य नाहीत हे वारंवार ओरडुन सांगणारे नगरसेवक प्रकाश पाठक याच मुद्यावर हायकोर्टात गेले आहेत. नगरसचिवांची निवड आणि बेकायदेशीर सर्वसाधारण सभा ह्या अनुषंगाने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. बुधवारी होणार्या सभेत नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत सहभाग नोदवू नये अन्यथा पद धोक्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. अशा एकुणच पार्श्‍वभुवर स्थायी सभा असा की सर्वसाधारण सभा. भाजपवाल्यांना मनपा चालविता येत नाही असा चुकीचा संदेश लोकांत जात आहे.

सभापती वादाच्या भोवर्यात
मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड दि. १४ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. परंतू कॉंगे्रस पक्षाने या निवडीवर आक्षेत घेत खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयीन प्रक्रि येत अडकलेली स्थायी समिती अन् सभापती आजची सभा कशी हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. सभापती पदावर विराजमान शैलेशला कानमंत्र अन् दिशा ठरविणारा शैलेशच असल्याची चर्चा मनपात असल्याने बिकट परिस्थितीत शैलेश स्थायी समितीचे शिवधनुष्य कसे पेलणार याची उत्सुकता सर्वांना लागूल राहिली आहे. 

अजेंडा उशिरा प्राप्त 
चार महिन्याच्या दिर्घ कालावधीनंतर आज स्थायीची सभा होत आहे. स्थायी सभेचा अजेंडा कार्यक्रम पत्रिका किमान तीन दिवस अगोदर निश्‍चित होणे गरजेचे असताना दस्तूर खुद्द स्थायी सदस्यांना देखील सोमवारी दुपारपर्यंत अजेंडा देण्यात आलेला नसल्याचे समजते. अशा गुंतागुंतीच्या पार्श्‍वभुमीवर आजची स्थायी सभा व उद्या होणारी सर्व साधारण सभा वादळी होणार हे मात्र नक्की.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment