स्थायी रद्द करण्याची भाजपावर नामुष्की

Tuesday, July 17, 2018


विरोधकांसह सताधारी सदस्यांनीही पाठ फिरवली, गटबाजी चव्हाट्यावर

लातूर / प्रतिनिधी 
लातूर शहर मनपातील सताधारी भत्तजपच्या नगरसेवकांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. सभापती ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी आयोजित केलेल्या पहिल्याच स्थायी समिती सभेकडे विरोधकांसह सताधारी सदस्यांनी पाठ फिरविल्यामुळे कोरमअभावी सभा रद्द करण्याची नामुष्की पत्करावी लागली. सताधार्‍यांच्या दिशाहीन कारभारामुळे शहरातील विकास कामांना फटका बसत आहे हे मात्र निश्‍चित 

सभापतीपदी निवड झाल्यानंतर ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी मंगळवारी पहिली स्थायी सभा बोलविली होती. कार्यक्रम याचिकेवर कोट्यावधीच्या विकास कामांच्या निविदांचा समावेश होता. दुपारी ३ वाजता सभेची वेळ निश्‍चित करण्यात आली. मात्र ३.४५ वा. पर्यंत सभापतींसह शैलेश स्वामी, संजय रंदाळे आणि शितल मालू हे चारच सदस्य उपस्थित होते. त्यावेळी सभापती गोजमगुंडे यांनी सभा अर्धा तास तहकुब करीत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जवळपास एक तासानंतर ते पुन्हा सभापती कक्षात आले आणि मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार कोरम पुर्ण होत नसल्याने सभा रद्द करत असल्याचे जाहीर केले. 

सताधारी चौघे गैरहजर 
नाराजी आणि गटबाजीने विखुरलेल्या सताधारी भाजपच्या नगरसेवकांनी स्थायीच्या सभेला गैरहजर राहून याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शिक्कामोर्तत केला. स्थायीचे सताधारी सदस्य आजय कोकाटे, नितीश वाघमारे, विशाल जाधव आणि सौ. दीपा  गिते हे चौघे ण आजच्या सभेकडे फिरकले नाहीत. 
कॉंग्रेसचा बहिष्कार 
स्थायी समिती सभापती निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची याचिका नगरसेवक दिपक सुळ यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या आठही सदस्यांनी आजच्या सभेवर बहिष्कार टाकला. आम्ही जेव्हा स्थायी समितीच्या बेकायदेशीर असल्याचे म्हणतो. तेव्हा अशा बेकायदेशीर सभेला का जायचे असा सवाल माजी सभापती अशोक गोविंदपुरकर यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला. 

आयुक्तांना पत्र 
कॉंग्रेस पक्षाने सभापती निवड विरूद्ध याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचे वकीलांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून आमच्या याचिकेवर खंडपीठात जो निर्णय होईल तोच आज १७ जुलै रोजी होणार्‍या स्थायी सभेतील निर्णयांना लागू राहील असे नमूद केले आहे. 

मनपाचे नेतृत्व करणार्‍या पदाधिकार्‍यांकडून समन्वयाचा अभाव, मनमानी निर्णया यातूनच भाजपच्या नगरसेवकांत नाराजी, गटबाजीचे उघड प्रदर्शन होत आहे. नेतृत्वाने वेळीच लक्ष देवून डागडुगी केली नाही तर फटका शहरातील विकास कामांना बसेल. परिणामी, मोठ्या अपेक्षेन मनपाची सुत्रे भाजपकडे देणार्‍या लातूरकरांचा भ्रमनिरास होईल यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment