पिककर्जासाठी कॉंग्रेसचे सेनगावात धरणे आंदोलन
हिंगोली / प्रतिनिधी
बँका दतक गावाचा नियम दाखवून बँकेकडे दतक असलेल्या गावातील शेतकर्यांनाच पिककर्ज देत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून बँकेत खाते असतानाही बँका दतक गाव नियमावर बोट दाखवत शेतकर्यांना पिककर्ज नाकारत आहेत. हे चुकीचे असून शेतकर्यांना तात्काळ पिककर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी खा. राजीव सातव यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. १५ जुलै रोजी सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर कॉंग्रेसच्या वतीने खा. सातवांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला शेकडो शेतकर्यांनी उपस्थिती लावली होती.
शेतकर्यांनी सावकाराकडून कर्ज घेवून खरीप पेरणी पुर्ण केली असली तरी अद्यापपर्यंत बँकांनी कर्जमाफ चे उद्दीष्ट पुर्ण केलेले नाही. कर्जासाठी शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवत असताना यंदा बँकांनी ङ्गक्त दतक गावालाच पिककर्ज देण्यात येईल अशी नियमावली काढल्याने गेल्या कित्येक वर्षापासून बँकेत खाते असलेल्या शेतकर्यांना बँका कर्ज देत नाहीत. तर दतक बँका शेतकर्यांना नव्याने खाते काढून कागदपत्रांची मागणी करीत आहेत. या पेचात शेतकरी सापडला असून याविरूद्ध कॉंग्रेसच्या वतीने सेनगाव येथे स्टेट बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. सातव यांनी भाजपाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्यांना फटका बसत आहे. बँकांना कर्जमाफ चे दिलेले उदिष्ट अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असल्याचे खा. सातव म्हणाले. या धरणे आंदोलनात मुद्रा योजनेचे कर्ज, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज तात्काळ देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. खा. सातव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या
या आंदोलनात तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष सतिश खाडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सरनाईक, डॉ. रवि पाटील, भागोराव राठोड, नगरसेवक विलास खाडे, पंचायत समिती सदस्य रायाजी चोपडे, हरीभाऊ गादेकर, श्रीरंग कायंदे, संतोष खाडे, अजय विटकरे, अमरदिप कदम, दिलीप होडबे यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनानंतर बँकेच्या शाखा अधिकार्यांसह तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment