कामाच्या मजुरीसाठी महिलांनी खणला पं.स.आवारात शोषखड्डा

Tuesday, July 17, 2018




कळमनुरी / प्रतिनिधी

तालुक्यातील रामवाडी येथे पाणी ङ्गाऊंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होते त्या अनुषंगाने संपुर्ण गाव शंभर टक्के शोष खड्डे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने तसा प्रस्ताव करून पंचायत समितीकडे सादरही केला होता. ग्रामस्थांनी स्वत: शोषखड्डे तयारही केले. पण अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे शोषखड्याचे पैसे न मिळाल्याने तेथील महिला, नागरीकांनी चक्क पंचायत समिती आवारात १५ जुलै रोजी शोषखड्डा करून मजुरीचे पैसे तात्काळ द्या या मागणीसाठी अनोखे आंदोलन केले.

रामवाडी येथील ग्रामस्थांनी गावात शंभर टक्के शोषखड्डे केले. पंचायत समितीच्या कार्यालयाच्या वतीने ५० लाभधारकांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. परंतू, संबंधित ग्रामसेवकानी काम मागणी अर्ज भरून दिले. तो पंचायत समिती कंत्राटी कर्मचारी निलंबीत झाल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी पं.स. कार्यालयात चकरा मारल्या. नवीन कर्मचार्यांनी मात्र ती कागदपत्रे कुठे आहेत. मला माहित नाही असे ग्रामस्थांना सांगितले. यामुळे मेहनत करून शोषखड्डे उभारलेल्या ग्रामस्थांना मजुरीपासून अलिप्त रहावे लागले आहे. गावकर्यांनी १०६ शोषखड्डे खोदून त्यात पाण्याच्या सिमेच्या टाक्या असा मोठा खर्च केला.

 पण केवळ पंचायत समितीच्या कामचुकार पणामुळे गावकर्यांना मजुरीच्या कामपासून वंचित रहावे लागले आहे. असा आरोप करत रामवाडी येथील महिला पुरूषांनी १५ जुलै रोजी चक्क पंचायत समितीच्या गेटबाहेरच शोषखड्डा करून मजुरीच्या पैशाची मागणी केली. या आंदोलनाने जाग्या झालेल्या प्रशासनाने एका महिन्यात मजुरीचे पैसे उपलब्ध करून देऊ असे आश्‍वासित केले. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जि.प.सदस्य सचिश पाचपुते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment