कारागृहातील मुलभूत सोयी- सुविधांसाठी नियोजन समितीकडे निधी मागणी करावी
लातूर,दि.१६:-
लातूर जिल्हा कारागृहात एकूण ४५२ कैदी आहेत.या सर्व कैदयांना कारागृहात मुलभूत सोयी , सुविधा मिळाल्या पाहिजेत. याकरिता कारागृह प्रशासनाने शौचालयाची दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही. बायोगॅस प्लँट, पिण्याचे पाणी यासह इतर मुलभूत सोयी- सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अभिविक्षक सल्लागार मंडळाच्या त्रैमासीक बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलिस उपअधिक्षक (गृह ) मधुकर जवळकर, जिल्हा कारागृह अधिक्षक मधुकर चौधरी, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, डॉ. एस.एन.बनशेळकीकर, डॉ.एस.बी कुलकर्णी,अशासकीय सदस्य पत्रकार अशोक चिंचोले,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती.पार्वती सोमवंशी , जिल्हा परिविक्षा अधिकारी दिलीप कारभारी अदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, कारागृहातील कैदयांना आवश्यक सोयी- सुविधा व प्रशिक्षण साहित्यासाठी निधी मागणी त्वरीत करावी.तसेच कारागृहातील न्यायाधीन बंदी असलेल्या कैदयांना पोलिसांच्या अपुर्या बंदोबंस्तामुळे साक्षीसाठी न्यायालयात हजर करता येत नसेल तर अशा कैदयांसाठी व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे साक्ष नोंदविण्याची सुविधा उपलब्ध् करुन दिली पाहीजे, असे त्यांनी सांगितले.
वेळोवेळी अपुर्या पोलिस बंदोबस्तांमुळे कैदयांना न्यायालयात हजर करता येत नसेल तर व्हिडीओ कॉन्फर्सिंग सुविधा न्यायालयाने वापरावी याबाबत जिल्हा प्रमुख न्यायाधीशींची चर्चा करुन व्हीसी सुविधा साक्षीसाठी वापरण्याची विनंती करण्यात यावी. असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून कैदी हा त्यांच्या कायदेशीर हक्कापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच आजपर्यंत अपुर्या पोलिस बंदोबस्तांमुळे किती कैदयांना व किती वेळा न्यायालयात साक्षीसाठी हजर करता आले नाही याची सविस्तर माहिती सादर करण्याची सुचना ही त्यांनी केली.
नांदेड कारागृहातून येथील कारागृहात स्थलांतरित करण्यात आलेल्या ११४ कैदयांना ही मुलभूत सुविधा दया. तसेच त्यांना ठेवण्यात आलेल्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ लावून घ्यावेत. असे ही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सुचित केले.
प्रारंभी कारागृह अधिक्षक चौधरी यांनी लातूर जिल्हा कारागृहाची बंदी क्षमता ५०० इतकी असून आजरोजी ४५२ कैदी असून यात पुरुष ४२९ व स्त्री २३ कैदी असल्याची माहिती दिली. न्यायाधीन बंदी आलेले ४४४ कैदी ,साधा कारावस-७ तर सक्षम कारावस असलेला १ कैदी असे एकूण ४५२ कैदी असून नांदेड येथे अतिवृष्टी झाल्याने तेथील कारागृहाची इमारत कोसळली त्यामुळे लातूर येथे १४४ कैदी आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.कारागृहाकडून एप्रिल -५४७,मे ६९२ व जून ७१६ कोर्ट पेशी प्रकरणात पोलिस पथक मागण्यात आले परंतु अनुक्रमे ३५९,३३०, व ४४४ या अनुक्रमे प्रकरणातच बंदोबंस्त मिळाला असून १८८,३६२, व २७२ या प्रकरणात बंदोबस्त मिळाला नसल्याची माहिती श्री. चौधरी यांनी दिली.
लातूर जिल्हयाला खुले कारागृहाची मान्यता प्राप्त झाली असून या कारागृहात ठेवण्यात येणार्या कैदयांची माहिती कारागृह प्रशासनाकडून लवकरच उपलब्ध् होणार आहे. यावेळी अशासकीय सदस्य श्री.चिंचोले व श्रीमती सोमवंशी यांनी ही कैदयांना मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध् करण्याची सुचना केली.
आणीबाणीमध्ये तुरूंगवास भोगलेल्यांना मानधन
सन १९७५ च्या आणीबाणीमध्ये लातूर जिल्हयातील ज्या लोकांनी एक महिना व त्यापेक्षा अधिक कालावधीचा तुरूंगवास भोगला असेल त्या व्यक्तींना महिना दहा हजाराचे मानधन.ती व्यक्ती हयात नसेल तर त्या व्यक्तीच्या पती/पत्नींला महिना पाच हजाराचे मानधन.त्याप्रमाणेच ज्या व्यक्तीने एक महिन्यापेक्षा कमी कालावधीचा तुरंगवास भोगला आहे त्या व्यक्तीला महिना पाच हजाराचे मानधन. जर ती व्यक्ती हयात नसेल तर त्या व्यक्तींच्या पती/पत्नींला अडीच हजाराचे मानधन राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.जिल्ह्यातील अशा पात्र व्यक्तीची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून त्याबाबतचे अर्ज त्वरित सादर करण्याचे आवाहन श्रीकांत यांनी केले.
No comments:
Post a Comment