राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
हिंगोली / प्रतिनिधी
जिल्ह्यात पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट अतिशय संथ गतीने सुरू असताना शेतकर्यांसमोर पिककर्जाचे नवे संकट उभे राहिले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या बँकेत खाते होते. ती बँक आता तुमच्या दतक बँकेकडे जा असे शेतकर्यांना सुचवित आहेतच. दतक बँकेत पिककर्जासाठी नव्याने सर्व गोष्टी कराव्या लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे दतक बँक कर्ज देईना आणि जुनी बँक उभं राहू देईना अशी परिस्थिती शेतकरी अनुभवतात याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने १६ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून तात्काळ पिककर्ज देण्यात यावेत अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
सोमवारी १६ जुलै रोजी शेतकर्यांच्या पिककर्जाबाबत राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये खांबाळा ग्रामस्थांची गेल्या दहा वर्षापासून स्टेट बँक ऑङ्ग इंडिया मध्ये खाते आहेत. पण ही बँक खांबाळा ग्रामस्थांना दतक गाव नसल्याने पिककर्ज देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांना दतक बँकेचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे ज्या बँकेत पुर्वी खाते होते. त्याच बँकेत नव्याने कर्ज देण्यात यावे, नाहरकत प्रमाणपत्राची गरज नसताना ते मागितल्या जावू नये, ज्या शेतकर्यांची कर्जमाङ्गी झाली आहे अशा शेतकर्यांकडूनही बँका चार्जेसच्या नावाखाली १८०० ते १५०० रूपये घेत आहेत. तर कॅनरा बँकेत कर्जमाङ्गी झालेल्या शेतकर्यांकडून कर्जाचे व्याज वसुल केल्या जात आहे.
त्यामुळे शेतकर्यांची ही पिळवणुक तात्काळ थांबवावी व शेतकर्यांची आर्थिक ङ्गसवणुक करणार्या बँकेच्या शाखा अधिकार्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंगे्रस हिंगोली तालुका अध्यक्ष माधव कोरडे यांनी केली असून निवेदनावर मजुर ङ्गेडरेशनचे माजी अध्यक्ष शशिकांत वडकुते, विनोद नाईक, ज्ञानेश्वर जगताप, उतम कंकाळे, केशव शांकट, गजानन शेळके, सचिन गुंडेवार, हनुमान मुटकुळे, भिकाजी करडीले, भागवत ठाकरे, गंगाराम पवार, मुकूंद शिंदे यांच्यासह शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
No comments:
Post a Comment