एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक दिघोरे यांच्या पथकाने जिल्ह्यातील मटका अड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू केल्यामुळे शहरातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मटका जुगार अड्डे बंद करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात व शहरात खुलेआम मटका जुगार सुरू झाला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाला प्रसार माध्यमे व राजकीय नेत्यांच्या टीकेचा सामना करावा लागत होता.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात व शहरात खुलेआम मटका जुगार सुरू झाला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाला प्रसार माध्यमे व राजकीय नेत्यांच्या टीकेचा सामना करावा लागत होता.
गेल्या आठवड्यात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी जाहीररीत्या मटका बंद करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाला दिला होता. शहरातील मटकाकिंग कमल गणेशलाल यादव (रा. मिल गेट), अन्वरअली खान अकबरअली खान (रा. मिल गेट), विक्की उर्फ विक्रम नंदलाल यादव (रा. मुरमुरा गल्ली) या तीन जणांना नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची कारवाई आली.

No comments:
Post a Comment