Saturday, December 22, 2018December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
मुबलक पाणीसाठ्या अभावी हळदीचे मोठे नुकसान झाले असून, त्या नुकसानीचे पंचनामे करून उत्पादक शेतकर्यांना एकरी 30 हजार रूपये मदत द्यावी, अशी मागणी किसान मंचचे जिल्हाध्यक्ष ततेराव मगर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने लहान- मोठ्या प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा झाला नाही. परिणामी, विहिरी, बोअरची पाणीपातळी आत्तापासूनच खालावली असून, पाणीसाठा नसल्यामुळे शेतकर्यांना हळद पिकाला पाणी देणे अशक्य झाले. त्यामुळे लागवडीच्या तुलनेत उत्पन्न होणार नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. शिवाय या पिकाला विमा भरण्याची सुविधाही नाही. त्यामुळे किमान लागवडतरी पदरात पडावा याकरीता शासनाने पंचनामाचे आदेश देवून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तातेराव मगर यांनी केली आहे.
नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
By Marathwada Neta
Saturday, December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
मुबलक पाणीसाठ्या अभावी हळदीचे मोठे नुकसान झाले असून, त्या नुकसानीचे पंचनामे करून उत्पादक शेतकर्यांना एकरी 30 हजार रूपये मदत द्यावी, अशी मागणी किसान मंचचे जिल्हाध्यक्ष ततेराव मगर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने लहान- मोठ्या प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा झाला नाही. परिणामी, विहिरी, बोअरची पाणीपातळी आत्तापासूनच खालावली असून, पाणीसाठा नसल्यामुळे शेतकर्यांना हळद पिकाला पाणी देणे अशक्य झाले. त्यामुळे लागवडीच्या तुलनेत उत्पन्न होणार नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. शिवाय या पिकाला विमा भरण्याची सुविधाही नाही. त्यामुळे किमान लागवडतरी पदरात पडावा याकरीता शासनाने पंचनामाचे आदेश देवून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तातेराव मगर यांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment