लातूर, दि. 13....
स्त्रीशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे, येणार्या काळात हिरकणी महाराष्ट्राची स्पर्धा घेतली जाणार आहे, यासाठी आपण सज्ज रहा, असं मत लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या हिरकणी महोत्सव 13 ते 17 जानेवारी दरम्यान होणार्या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी बोलतांना केले. यावेळा व्यासपीठावर समाजकल्याण सभापती संजय दोरवे, कृषि सभापती बजरंग जाधव, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे हे उपस्थित होते.
![]() |
छायाचित्र तम्मा पावले |
या कार्यक्रमास युवानेते अरविंद पाटील निलंगेकर हे मात्र श्रोत्यांत बसून होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. अनेक स्टॉल याठिकाणी उभारण्यात आले होते. पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, मी कधीही भाषणाला उभे राहत असतांना मुद्दे किंवा पॉईंटस घेत नाही आज मी पाहिलं याठिकाणी कांही विसरुन राहू नये म्हणून मी कांही मुद्दे बोलणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल धन्यवाद देत असतांना ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, माझी आई, माझी बहीण या महिलांत मला दिसत आहेत. आज फक्त 9 टक्के महिला उद्योजक आहेत. तर जगात भारत 9 व्या क्रमांकावर आहे. ज्यावेळा 50 टक्के महिला या उद्योजक होतील तेंव्हा भारत देश हा जगात क्रमांक एकचा देश असेल.
100 टक्के महिला उद्योजक
अभ्यासपूर्ण भाषणात ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, आपल्याकडे 100 टक्के महिला या उद्योजक आहेत. आम्ही निर्णय घेतला, पंचायत समितीच्या बंद इमारती या महिला बचत गटांना द्यायच्या आणि त्याच्या चाव्या आज दिल्या आहेत. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात आपलं सरकार आहे, राज्यात देेवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आपलं सरकार आहे. आज जिल्हा परिषदसुद्धा आपल्याच ताब्यात आहे, असं सांगून सरकारने 0 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे सांगत असतांना त्यांनी छोटसं उदाहरण दिलं, लेकराच्या हातात दिलेल्या पैशातून एक बकरी घेतली, एका बकरीच्या चार बकर्या झाल्या. नंतर सोनं घेतलं आणि अशापद्धतीने महिला ही काम करत आहे.
हिरकणी ब्रॅण्ड
पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळा हिरकणी हे नाव का असं सांगताना रायगडावर दुध घालणारी गवळण हिरकण होती. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर माझ्या लेकराचं कसं म्हणून ती न घाबरता सरळ बुरजावरुन उतरली आणि छ. शिवरायांनी त्या बुरुजाला हिरकणी नांव दिलं.
1 लाखाचे बक्षीस
यावेळा हिरकणी हे ब्रॅण्डनेम करण्यासाठी आम्ही सिम्बॉल मागवणार आहोत. जो सीम्बॉल मंजूर होईल त्याला 1 लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे, असंही सांगितलं. आपणास सीएसआरमधून अधिकात अधिक निधी दिला जाईल, याची ग्वाही दिली. मराठवाड्याची महिला ही कशाप्रकारे योग्य आहे याचं त्यांनी एक उदाहरण देत पिंपरी चिंचवड येथे वधु-वर सुचक मंडळात मराठवाड्याची सून आणण्याचा लोकांचा आग्रह असतो हे सांगितलं. आपणांस व्यासपीठ देण्याचं काम आम्ही करत आहोत. हिरकणी महाराष्ट्राची ही स्पर्धा लवकरच घेतली जाणार आहे. पायलट जिल्हे म्हणून लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्याची निवड झाली आहे.
पहिल्या टप्प्यात अडीच कोट रुपये हे दिले जाणार आहेत आणि स्टारटप क्वॉलिटीप्रमाणे प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण शिबीर घेतले जाणार आहेत. त्यानंतर हा प्लॅन सादर करण्यासाठी 100 बचत गटांना 3 हजार रुपये दिले जाणार आहेत. 25 हजार रुपये प्रत्येक खात्यावर पहिल्या 10 बचत गटांना दिले जातील, असे जिल्ह्यातील 100 बचत गटांना पैसे दिले जाणार आहेत. पुन्हा जिल्हास्तरावरील 10 बचत गटांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. असंही यावेळा ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यंनी सांगितलं. ते म्हणाले की, हिरकणी लातूरची ही योजना सर्व महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे.
आमचं सरकार हे भविष्याच्या निर्मितीचं विचार करणारं सरकार आहे आणि त्या दृष्टीकोणातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर सर्व बचत गटांना पालकमंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या. अत्यंत सुरेख मांडणी भातलवंडे यांनी केली होती. संचलन उद्धव फड यांनी केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती करणार्या महिला आणि बचत गटं हे दिसून आले होते. प्रचंड गर्दी, नियोजन हे दिसून आलं.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment