दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्रावरच चाकूहल्ला

Sunday, January 13, 2019


औरंगाबाद : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने किरकोळ वादातून त्याच्याच मित्रावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.

ही दोन्ही मुले ज्योती नगर मधील चाटे क्लास मध्ये शिकतात ट्युशन संपल्यानंतर गणेश काळे याच्यावर आरोपीने मागून पाठीवर चाकूने तीन वार केले यात गणेश जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत.

ही दोन्ही मुले अल्पवयीन असून विद्यार्थ्यांमध्ये या आधी भांडणे झाली होती असे पालक व शिक्षक सांगत आहेत. पोलीस पुढील तपस करत आहेत. अचानक चाकू हल्ला झाल्याने सगळेच हादरलेत.

No comments:

Post a Comment