Sunday, January 13, 2019January 13, 2019
मुंबई : देशात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशातील अनेक शहरात पतंग उडवण्याची परंपरा आहे. यावेळी बाजारात एकीकडे तिळगूळ, तीळ दिसतात तर दुसरीकडे रंग-बेरंगी पतंग दिसतात. संक्रांतीला मोठ्या संख्येने आकाशात पतंग दिसतात, तर काही लोक आपल्या कुटुंबासोबत पतंग उडवतात. याशिवाय दिवाळीतही पंतग उडवला जातो.
नुकताच ठाकरे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील बाजारात ‘ठाकरे’ सिनेमाची पतंग मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. मकरसंक्रांतीच्या काही दिवस आधीपासून लोक पतंग उडवत संक्रांतीचा आनंद लुटतात.
मकरसंक्रांतीला पंतग उडवण्याचे धार्मिक महत्त्व
भगवान श्री राम यांच्या वेळेपासून भारतात पतंग उडवण्याची परंपरा आहे अस बोललं जातं. तर तमिळच्या तन्दनानरामायणानुसार, रामाने मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला होता आणि तो पतंग इन्द्रलोकमध्ये गेला होता.
मकरसंक्रांतीला पतंग उडवणे आरोग्यास लाभदायक
मकरसंक्रांतीला पतंग उडवणे आरोग्यास लाभदायक असते. तसेच सकाळच्या वेळेस पतंग उडवला तर ऊर्जा मिळते. यासोबत व्हिटॅमिन डी मिळते, ऊन्हामुळे आणि थंडीमुळे त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळते, असं म्हटलं जातं.
पतंग देतो प्रेमाचा संदेश
पतंगीला आझादी, आनंद आणि शुभ संदेशाचे प्रतीक मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी काही लोक यावेळी तिरंगा पतंगही उडवतात. तसेच पतंग उडवल्याने मानसिक तणाव संतुलित राहते आणि मन प्रसन्न राहते असं म्हटलं जातं.
तुम्हाला माहित आहे ? मकरसंक्रांतीला पतंग का उडवतात?

By Marathwada Neta
Sunday, January 13, 2019

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment