आपला राष्ट्रध्वज : आपला स्वाभिमान अरविंद पाटील निलंगेकर यांचे महत्वपूर्ण कार्य

Saturday, January 12, 2019
लातूर, दि. 11 .... 
येथे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात विविध महत्त्वपूर्ण, क्रांतीकारक व राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबवले जात आहेत आणि मेरा देश बदल रहा है... मेरा लातूर जिल्हाभी बदल रहा है...
 हे युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात राबवले जात आहेत.


 18 जानेवारी रोजी आपला राष्ट्रध्वज ः आपला स्वाभिमान हा अत्यंत क्रांतीकारक, धाडशी आणि राष्ट्रीय एकात्मतेचं सुंदर देखावा यानिमित्ताने दिसणार असून 18 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडांगणाच्या मैदानावर 150 मिटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला असून त्याचा शानदार उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री ना. विनोदजी तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर हे भूषवणार आहेत. या सोहळ्यास खा.डॉ. सुनिल गायकवाड, आ. बसवराज पाटील, आ. अमित देशमुख, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, आ. विक्रम काळे, आ. सतिश चव्हाण यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. याचं संपूर्ण नियोजन युवानेते अरविंद पाटील निलंगेकर हे करत आहेत. 

यामागच्या भूमिका आपला राष्ट्रध्वज: आपला स्वाभिमान हा सोहळा प्रेरणादायी ठरावा आणि एवढेच नाही तर याप्रसंगी 11 हजार 1111 विद्यार्थी, विद्यार्थीनी राष्ट्रभक्तीपर गीत गाणार आहेत. अशाप्रकारे युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांचं संघटन कौशल्य, यांची कल्पकता आणि खर्‍या अर्थाने जे जे नवं... ते लातूरला हवं... यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न अरविंद पाटील निलंगेकर यांचे सुरु आहेत. आत्तापर्यंत फक्त जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती याच निवडणुकीत फक्त मतासाठी प्रयत्न नाही केला तर स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष पद नाकारलं. यासाठी त्यागाची भूमिका लागते. ते त्यांनी दाखवली. मला काय करायचंय, अशा प्रकारची भूमिका न घेता त्यांनी जे वेगवेगळ्या उपक्रमाचं, कार्यक्रमाचं नियोजन केलं ते इतिहासात नोंद घ्यावं असच आहे. ज्यात 1. छत्रपती शिवाजी राजांची रांगोळी त्यासाठी केलेलं नियोजन, त्यासाठीचं संघटन, 2. लातूरच्या रेल्वे बोगीचा कार्यक्रम घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोचवण्यासाठी राबवलेली यंत्रणा ही अत्यंत अभिनंदनीय आहे. त्यामुळेच त्यांनी कुठंही स्वतःच नाव न येवू देता जे नियोजन केलं ते लाख मोलाचं आहे. त्याचप्रकारे 3. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवत असतांना लोकसहभागातून जे अहोरात्र परिश्रम केले तेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. 4. भुकंपात 30 सप्टेंबर रोजी जो भारतीय जैन समाजाचा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व जैन समाजाचे मान्यवर उपस्थित होते. 

यासाठी गावागावापर्यंत जाऊन जे काम केलं तेसुद्धा तेवढच महत्त्वाचं आहे. 5. लातूर येथे महाअटल आरोग्य शिबीर जे राबवलं, ज्याचा 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. यासाठी ज्या बैठका घेतल्या, जे नियोजन केलं, जी यंत्रणा राबवली ती अत्यंत अभिनंदनीय आहे. 6. लातूर येथे पहिल्यांदाच रेल्वेमार्फत जे तज्ञ डॉक्टर आले होते त्याची जी यंत्रणा राबवली होती यातसुद्धा अरविंद पाटील निलंगेकरांचं खूपच महत्त्वाचं नियोजन आहे. 7. मुख्यमंत्री चषक योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवत असतांना संपूर्ण लातूर जिल्ह्यात त्यांनी जे नियोजन केलं, जो समन्वय ठेवला तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. 8. लातूर येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जे नियोजन केलं होतं. चार जिल्ह्यातील शक्तीकेंद्र आणि बुथप्रमुख हे अत्यंत अभिनंदनीय आहे. पद असल्यानंतर लोक काम करत नाहीत. पण कुठल्याही प्रसिद्धीच्या झोतात न राहता प्रसिद्धीपासून दूर राहून अत्यंत कुशल संघटन पद्धतीने अरविंद पाटील निलंगेकर हे काम करत आहेत. 

18 तारखेला आपला राष्ट्रध्वज : आपला स्वाभिमान हा महत्त्वपूर्ण, क्रांतीकारक कार्यक्रम होणार आहे. त्यासंदर्भात लोकजागृती करत असतांन लातूर शहरामध्ये अभूतपूर्व मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे आणि परराष्ट्रात जाऊन एम.बी.ए.चा अभ्यासक्रम, पुणे येथे एमआयटीमध्ये नेतृत्व विकसीत करण्याचा अभ्यासक्रम हे सर्व करत असतांना अत्यंत संयमाने, नियोजनपद्धतीने, विनम्रतेने व खर्‍या अर्थाने त्यागाच्या भूमिकेतून आपला राष्ट्रध्वज: आपला स्वाभिमान हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. 

तसं अरविंद पाटील निलंगेकर हे जिल्हा परिषदेला बिनविरोध निवडून आले असते व मंत्र्याचा भाऊ म्हणून त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली असती पण सर्वसामन्य कार्यकर्त्याची कदर व्हावी असं हे दुर्मीळ नेतृत्व असून अहोरात्र परिश्रम, मेहनत, नियोजन ते करत आहेत आणि अशाचप्रकारचा देखणा सोहळा 18 जानेवारी रोजी लातूरात होणार आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 


Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment