
पेट्रोलपंपावर मोबाईल बाळगल्याने आगीच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये मोबाईलवर संभाषण करताना आग लागू शकते. कारण मोबाईलमध्ये मोबाइलवापरासाठी बॅटरी असते. अशावेळी बॅटरी गरम असेल किरणे उत्सर्जित करते. गरम झालेल्या गाडीच्या टँकमधून येणाऱ्या पेट्रोलच्या वाफेशी जर या किरणांचा संपर्क आला तर आग लागू शकते. अशावेळी मोठा स्फोट घडू शकतो कारण पेट्रोल वाफेचा ज्वलनांक २३ अंश डिग्री सेल्सिअस असतो.
दरम्यान नोटबंदीनंतर अनेक ठिकाणी ई वॉलेट चा वापर वाढला. परिणामी मोबाईल बँकिंग वाढीस लागली. त्यामुळे पेट्रोलपंपावर बिल भरताना सर्रास मोबाईलचा वापर करण्यात येऊ लागला. त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडू लागल्या. सुरक्षेच्या दृष्टीने तेल उद्योग सुरक्षा संचालक मंडळाने मोबाईल वापरावर बंदी आणली आहे.त्यामुळे नागरिकांनी यासाठी काही नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पेट्रोल भरण्यापूर्वी गाडीचे इंजिन बंद करणे. पेट्रोल भरल्यानंतर काळजीपूर्वक पेट्रोल टँकची तोटी बंद करणे. पेट्रोल पंपाच्या आवारात धूम्रपान न करणे , या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामुळे मोबाईल सुरक्षित राहून आग लागण्याच्या घटनांना आवर घालता येईल. त्यामुळे पेट्रोलपंपावर मोबाईल वापरास बंदी आहे.
No comments:
Post a Comment