नऊ महिने गर्भ वाढवला प्रसुतीच्या वेळी पोटात बाळ नसून चक्क गाठ !

Saturday, January 12, 2019

नांदेड : गर्भधारणा झाली समजून एका महिलेने नऊ महिने गर्भाची वाढ केली. पण प्रसुतीच्या वेळेस पोटात बाळ नसून गाठ असल्याचं निष्पन्न झालं आहे. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन डॉक्टारांनी महिलेच्या पोटातून दहा किलोचा मासाचा गोळा बाहेर काढला. नांदेडमध्ये हा प्रकार घडला.
शहरातील मिल्लत नगर येथील परवीन बेगम या महिलेल्या नऊ महिन्यापूर्वी गर्भधारणा झाल्याचं लक्षात आलं होतं. अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्यानं त्यावेळी तिने आणि कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखवले नाही.
पोटात बाळ असल्याचं समजून तिने गर्भाची वाढ केली. नवव्या महिन्यात पोटात त्रास सुरू झाल्याने ती प्रसुतीसाठी पुर्णा येथे आईकडे आली.

त्या ठिकाणी सोनोग्राफी केल्यानंतर पोटात बाळ नसून गाठ असल्याचं तपासात आढळलं. तातडीने तिला नांदेडच्या गुरू गोविंद सिंघई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे देखील अनेक तपासण्या करण्यात आल्या. तेव्हा, तिच्या पोटात फायब्राईडची मोठी गाठ असल्याचं समजलं. अंत्यत अवघड असलेली शस्त्रक्रिया याच दवाखाण्यात करण्याचा निर्णय प्रसुती विभाग प्रमुख डॉ .शिरीष दुल्लेवाड यांनी घेतला.

तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून ती दहा किलोची फायब्राईडची मोठी गाठ पोटातून काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. शस्त्रक्रिया करतांना तिची गर्भपिशवी सुरक्षित ठेवण्यात देखील यश आलं आहे. त्यामुळे ती पुन्हा आई होऊ शकते. 28 वर्षीय परवीन बेगम हिला यापूर्वी एक मुलगा आहे. आता ती दुस‌ऱ्यांदा गर्भवती राहिल्याचा अंदाज घेऊन सर्वानीच या जिवघेण्या फायब्राईडगाठी कडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, त्या काळात परवीनच्या शरीरातील हार्मोंन्सचे प्रमाण कमी अधीक झाल्याने मासिक पाळी बंद झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती ठणठणीत आहे.

No comments:

Post a Comment