नाफेडद्वारे हरभरा खरेदी सुरू

Tuesday, May 29, 2018
कळमनुरी : कळमनुरी येथील हरभरा खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांना बाहेरील व्यापार्‍यांकडे कवडीमोल भावाने हरभरा विकावा लागत असे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी २४ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत २८ मे रोजी हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील हरभरा केंद्र बंद असल्याने शेतकरी हमीभावापासून वंचित राहत होता. बाहेरील व्यापारी प्रतिक्विंटल ३५०० ते ३००० दराने हरभरा घेत असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च निघणेही अशक्य झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी याविरूद्ध आवाज उठवुन जिल्हाधिकार्‍यांकडे कळमनुरी तालुक्यातील शेतकर्‍यांना हरभरा केंद्र सुरू करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातुन केली होती. त्यानंतरही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मगर यांच्या रेट्यामुळे कळमनुरी येथील हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले असून शेतकर्‍यांतुन समाधान व्यक्त होत आहे. 

No comments:

Post a Comment