स्कुलबस पलटी होवून एका तरूणीचा मृत्यु : उदगीर -अवलकोंडा रस्त्यावरील घटना !

Monday, February 4, 2019

अमोल कळसे 
उदगीर / तालुका प्रतिनिधी :- येथील दत्तनगर मादलापुर रोडवरील यशवंत प्राथमिक व आदित्य इंग्लिश स्कुलची दररोजच्या प्रमाणे स्कुल बस गाडी कमांक एमएच १र एफ सी ३२२१ शाळेची मुले आणण्यासाठी उदगीरहुन अवलकोंडा गावात सकाळी आठच्या सुमारास तेथील मुले घेवुन उदगीरला निघाली असता प्रियंका व्यंकट बोईनवाड (वय १९) रा. अवलकोंडा ही उदगीरच्या शिवाजी महावियालयात पदवी द्वितीय वर्षात शिकणारी मुलगी बसला जाण्यासाठी थांबली होती.


आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

बसच्या वेळी ही स्कूलबस आल्याने या मुलीने हात दाखवून लिफ्ट मागितली या बसचा चालक मारोती गुडसुरे गावातीलच असल्याने त्याने गाडी थांबवून गाडीत घेतले.गाडी रस्यात आल्या नंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खडयात जावून पलटी झाली त्यात या तरुणीचा मृत्यू झालां. या गाडीत असलेले वीस ते बावीस बालक किरकोळ जखमी असल्याची माहीती पोलीसांनी दिली. 

या घटनेची माहीती मिळताच पोलीस जमादार नामदेव सारुळे व चंदकांत कलमे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून घटनेची माहीती घेतली.या तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुजालयात आणण्यात आला असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

No comments:

Post a Comment