जनता जनार्दनानी स्विकारलंय हे नेतृत्व

Monday, February 4, 2019

लातूर दि  ४ प्रतिनिधी 
दिवसेंदिवस राजकारण गतिमान होत आहे. एका दिवसात राजा होण्याचं स्वप्न अनेकांना पडत आहे. हा लोकशाहीचा खूप मोठा विजय आहे. पण मतदार राजा हा सगळं ओळखत असतो आणि म्हणूनच म्हटलं जातं, ये पब्लिक है, ये जब जानती है...


आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

 लोकशाहीमध्ये लोकांना आपली कामं व्हावी असं वाटत असतात. त्यामुळं जो तो आपआपल्या परीन आपलं आपलं घोडं दामटण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये असं कांही चित्र निर्माण होतं की, बर्‍याचवेळा दायी ही आईचं रुप घेत असते. ती म्हणत असते की, किती चांगलं मुल आहे, किती गुटगुटीत आहे आणि हे बाळंतपण मीच केले. पण मुलाला जन्म देण्याच्या यातना, वेदना या आईला झालेल्या असतात. दायीने हे नौकरी म्हणून, सेवा म्हणून सुश्रुशा केलेली असते आणि म्हणून दायी ही आईची बरोबरी करु शकत नाही. कारण पुत्र प्राप्ती ही एका दिवसात होत नसते आणि यासंदर्भात आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण सांगावसं वाटतं की, एक अधिकारी रस्त्याच्या कडेने चाललेला असतो त्याला टपोरे ज्वारीचं दाणे असलेलं एक शेती दिसते. तो ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवतो आणि त्या कणसाला हातात घेवून म्हणतो, किती टपोरेदार कणीस आहे त्यावेळी तो शेतकरी म्हणतो, आमची जमिनच चांगली आहे. तेथे कष्ट करणारा मजून म्हणतो. मी कष्ट केलं म्हणून हे टपोरेदार कणीस झालं.

 त्याचवेळा बियाणे विक्रेता तिथे आलेला असतो तो म्हणतो हे बियाणे माझ्या दुकानातले आहेत. त्यावेळा गावातील एक सूज्ञ, जाणकार, अनुभवी व्यक्ती तेथे आलेला असतो, तो म्हणतो, हे जे टपोरेदार कणीस आहे ना ते कशामुळं आहे तर याठिकाणी एक ज्वारीचा दाणा हा स्वतःला जमिनीत गाडून घेतो, त्याची जीवनयात्रा संपवतो, त्याला कोंब फुटते आणि टपोरेदार चारशे-पाचशे दाण्याचं एक ज्वारीचं कणीस बनतं हे एक उदाहरण झालं. हे उदाहरण वास्तव आहे, हे उदाहरण सत्य आहे, हे उदाहरण खरं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने लोकांची मनं जिंकली आणि सिद्ध केलं की, आम्ही लोकांचे आहोत, लोकांनी आम्हाला स्विकारलंय आणि यापेक्षा जवळच सुंदर चांगलं उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातील भाजपची नेत्रदिपक घोडदौड, वाटचाल यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निलंग्याचे सुपूत्र ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी नियोजन केलं, लोकसंपर्क ठेवला आणि या सर्व पार्श्‍वभूमीवर लोकांनी ते नेतृत्व स्विकारलं.

 लातूरची महानगरपालिका, लातूरची जिल्हा परिषद, निलंग्याची नगर पालिका आणि जोडीला जोड म्हणून पडद्यामागं राहून या ज्वारीच्या एका बियाप्रमाणे गाडून घेवून, पुरून घेवून जे अरविंद पाटील निलंगेकर यांनी काम केलं त्यामुळं लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं कार्य उभा राहिलं. त्यांना साथ आहे विनायकराव पाटलांची, त्यांना साथ आहे आ. सुधाकर भालेराव यांची, त्यांना सहकार्य आहे रमेशअप्पा कराड यांचं आणि म्हणून संभाजीरावांच नेतृत्व हे लोकांनी स्विकारलं आणि त्यांचे छोटे भाऊ म्हणून अरविंद पाटलांनी अनेक प्रलोभनं, सत्तेची पदं नाकारली. आणि लोकांत जायचं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, नियोजन करायचं काम केलं. हे बघून अनेकांचं पोट दुखतंय आणि चित्र कसं होतयं हे कांहीजण सूर्याचा प्रकाश न बघवतेपणी सूर्याकडे बघून थुंकतात. असं चित्र विरोधकांचं होत चाललंय. कांही अंशी स्वकीयांचंसुद्धा पोट दुखायला सुरुवात होतं. यावेळा गांवढळ भाषेत एक उदाहरण देतात ते बैलाला झुल असते म्हणून तो देखणा दिसतो...ही झूल काढली की बैलाच्या पाठीवर चाबूक पडत असतो... यासंदर्भात भारताचे विकासपुरुष ना. नितीनजी गडकरी यांचं एक उदाहरण कायम सगळेचजण देतात, ते येथे लागू पडतं. ते म्हणतात, चहापेक्षा केटली गरम... आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांच्या अनुभवाच्या बोलातून सांगावसं वाटतं की, नेतृत्व हे लोक स्विकारत असतात आणि हे स्विकारलं कशावरुन ओळखायचं, तर जेंव्हा त्यांच्या कार्याला यश मिळतं, लोकांची साथ मिळते, हजारो हजार कार्यकर्ते एका आवाजात खंबीरपणे साथ देतात. हे दादागिरीनं होत नाही, हे प्रशासनातल्या हुकूमामुळं होत नाही, तर हे घडत असतं लोकांच्या सुख-दुःखात धावून गेल्यानंतर आणि लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असतांना अनेकांना नाव ठेवायची सवय असते.

 त्यात सर्वच घटक असतात आणि नाव ठेवून ठेवून ठेवून जेंव्हा नेतृत्व कांहीच उत्तर देत नाही तेंव्हा वेड्यागत आपले कपडे फाडून घेण्याची वेळ येते. पण लक्षात येत नाही की, समोरची माणसं हे पार्टी/पक्ष हा परिवार समजले आणि म्हणूनच हे नेतृत्व स्विकारलं गेल. अरविंद पाटलांनी नेतृत्व मागितलं नाही, उलट लोकांचा आग्रह असताना, लोकांची इच्छा असताना आम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सर्वसामान्य शेतकरी करायचंय, मंत्र्याचा भाऊ नाही करायचा यासाठी फार मोठा त्याग लागतो. राजकारणात तवेपेकी मेरी, हातपेकी तेरी... म्हणजे तव्यावर भाजत असलेली भाकरी माझी या भूमिकेतून लोक काम करत असतात आणि यावेळा त्या ज्वारीच्या बियासारखं एक अरविंद पाटील नाही तर हजारो कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ती भारतीय जनता पार्टीची असली पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली वारंवार दिसून येते. 

मराठीत एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं...म्हणून जग फसतं... बर्‍याचवेळा व्यक्तीच्या दिसण्यामुळं त्याची प्रतिमा निर्माण केली जाते आणि एकच गोष्ट हजारवेळा सांगून ते दादागिरी करतात, ते हुकूमशहा आहेत, ते शिव्या देतात अशाप्रकारचा अपप्रचार करण्याचं पाप घडत असलेलं बघायला मिळतंय. आपण इतिहासात पाहिलं, तर लक्षात येतं की, चक्रव्युहात जाणं सोपं असतं पण ते भेदणं सर्वांना सोबत, सर्वांचा सन्मान करणं, सर्वांना मदत करणं आणि त्यागातून माझा नेता हा मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो आणि नेमकं हे जेंव्हा घडत नाही तेंव्हा माणसात नैराश्य येतं.

 पण अत्यंत सहजपणे म्हणावसं वाटतं की, वेगवेगळ्या योजना खेचून आणण्यासाठी, मतदार माझी आई आहे हा पक्ष सत्तेत आहे म्हणून देशात आणि राज्यात करोडो लोकांच्या हिताचे, लोककल्याणकारी निर्णय घेतले जातात. यासाठी प्रचंड संयम लागतो. होणार्‍या टीकेवरुन विचलीत न होता सतत काम करणं, लोकांत जाणं यासाठी आम्ही यानिमित्तानं सांगू इच्छितोत की, ते कार्यकर्त्यांचं मनावर प्रेमानं राज्य करतात. त्यांना कधीही, कोठेही उपाधी लावून घ्यायची वेळ येत नाही. लातूर जिल्हा हा भाग्यशाली जिल्हा आहे की पण ज्या जिल्ह्यात गेल्या 60 वर्षात एकही मोठा प्रकल्प आला नव्हता तो आला. राष्ट्रीय महामार्ग आले, बरेच पूर्ण झाले आणखीन टप्प्याटप्प्याने विकासाची गंगा संपूर्ण जिल्ह्याला मिळाली पाहिजे. हे कधी घडतं, जेंव्हा पार्टी / पक्ष हा परिवार मानला जातो.

 हे येर्‍यागबाळ्याचे काम नाही आणि येथे कोणीही कोणावर नेतृत्व लादलं नाही ते स्विकारलंय आणि म्हणूनच आम्हाला यानिमित्तानं एकच म्हणावसं वाटतं की, एखाद्याला विनाकारण नाव ठेवून माणसं मोठी होत नसतात, मन मोठं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, विकासात्मक भूमिका पाहिजे आणि त्याचवेळा नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व हा त्रिवेणी संगम जपला जावू शकतो.

 येणार्‍या काळात जनता जनार्दन दाखवून देईल की, होय... नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जे कार्य केलं आहे ते सुवर्ण अक्षराने नोंद व्हावं असं आहे. यामुळे कोणाचा जळफळा झाला, कोणाला वाईट वाटलं तर त्याचा विचार करायचा नसतो कारण नेत्याला कायम अग्नी परीक्षेतून सामोरं जावं लागतं आणि ती अग्नीपरीक्षा तेंव्हाच यशस्वी होते जेंव्हा शासन आणि प्रशासन याच्या जोरावर लोकांना शासन न करता, भिषण न वागता, सर्वांना सोबत घेवून काम करावं लागतं आणि म्हणूनच म्हटलं जातं की, शुद्ध बिजापोटी फळे रसाळगोमटी आणि त्यावेळा म्हणावं लागतं, उघडा डोळे बघा निट आणि लक्षात येतंय की हे नेतृत्व अरविंद पाटलांच नेतृत्व, संभाजीराव पाटलांच नेतृत्व हे जनता जनार्दनानी स्विकारलयं आणि ते तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतात.

 लोकशाहीत लोकमताचा आदर आणि कदर करणं सूज्ञ आणि जाणकार लोकांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. ये भी मेरा, ओ भी मेरा सबकुछ मेरा अशाने लोकशाही जिवंत राहत नाही, अशाने नेतृत्व स्विकारलं जात नाही. आणि म्हणून आम्ही धन्यवाद देवू इच्छितोत. लातूर जिल्ह्यातल्या भाजपला, अरविंद पाटील, संभाजीराव पाटील त्यांच्यावर संस्कार करणार्‍या मातोश्री आक्कांना. त्यांना साथ देणार्‍या आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, रमेशअप्पा कराड आणि हजारो हजार मतदारांना, शेकडो लोकप्रतिनिधींना.लातूर जिल्ह्यातील जनता जंर्धनाला हे माहित आहे विकासाचा रथ कोण खेचत आहे त्या मुळे सावली खालून चालणाऱ्यानी जपून चालावे. 

No comments:

Post a Comment