मुंबई / प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनात हिंसा, आत्महत्या करू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर बैठक घेतली. या बैठकीत मान्यवरांनी काही सुचना सादर केल्या. त्या महत्वाच्या सुचनानंतर सरकार लवकरच तोडगा काढले असेही बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीला ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे, कला दिग्दर्शक नितीन देसाई, अभिनेते अमोल कोल्हे, सयाजी शिंदे, नॅचरल शुगरचे बी.बी.ठोंबरे, डॉ. सतीश परब आदी उपस्थित होते. सरकारच्या वतीने महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर उपस्थित होते. कायदेशीर आरक्षण देण्यासाठी सरकार वचन बद्ध असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
No comments:
Post a Comment