गावाच्या विकासासाठी शाश्वत स्वच्छता महत्त्वाची-उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके

Thursday, August 2, 2018



लातूर दि-२ हागणदारीमुक्त गाव जिल्हा नंतर स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी गावासासाठी शाश्वत स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके व्यक्त केले.जिल्हास्तरीय शाश्वत स्वच्छतेच्या कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी पुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी परगे,युनिसेफच्या राज्य सल्लागार अपर्णा कुलकर्णी-गोवंडे, प्रायमोव्हचे सचिन हतळगे,यांची उपस्थिती होती.

तिरूके पुढे बोलताना म्हणाले की सदयस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे,त्यामुळे ज्यांचे आरोग्यमान, पर्यायाने जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे . (उदा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,  निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना,स्मार्ट ग्राम,आता स्वच्छ भारत मिशन, वगैरे) यामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यापूर्ण उत्स्फुर्त सहभाग घेतला.घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता व्हावी व सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मानव पर्यार्याने जीवनमान उंचवावे व त्यायोगे  "स्वच्छतेतून समृध्दीकडे'' हे संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. 

 तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न परिसर, गाव व पर्यायाने देशाची निर्मिती करणेही काळाची गरज असल्याने जल, जमीन,  जंगल, हवा, वनस्पती इ. चे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी -  सुविधांची निर्मिती "पर्यावरण संतुलन''  ठेऊन केल्यास नागरीकांचे जीवनमान,  दर्जा सुधारण्यास मदत होईल, त्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकांमध्ये खोलवर रुजण्याची नितांत आवश्यकता आहे.


तसेच कचरापेटयांची पुरेशी संख्या, ओला, सुका व प्लॅस्टिक कचरा यांचे वेळोवेळी वर्गीकरण व विल्हेवाट, कचरा उचलून नेण्याची सातत्यपूर्ण व स्वतंत्र व्यवस्था, ओल्या कचऱ्याचे नॅडेप/ गांडूळखत/कंपोस्टखत इ.  मार्गाने खतात रुपांतर व पूनर्वापर तसेच दवाखाने, रुग्णालये येथील घातक ठरणाऱ्या कचऱ्याची शास्त्र शुध्द पध्दतीने विल्हेवाट लावून आर्थिक उत्पन्नही मिळविता येवू शकते. यातही काम करणे आवश्यक आहे .असेही ते म्हणाले साधन व्यक्ती म्हणून युनिसेफच्या राज्य सल्लागार अपर्णा कुलकर्णी- गोवंडे, प्रायमुव्हचे सचिन हत्तळगे,    यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन संवादतज्ञ उध्दव फड तर आभार जनार्दन समुद्रे यांनी केले.

No comments:

Post a Comment