लातूर कुस्ती फेस्टिवलचा दीपक कराड विजेता

Monday, September 10, 2018


प्रतिनिधी / 

सृष्टी वेलफेअर सोसायटी व लातूर जिल्हा कुस्ती परिषद यांच्या संयुक्त विद्यमान आयोजीत केलेल्या " लातूर कुस्ती फेस्टीव्हलचा दीपक कराड विजेता ठरलेला आहे . या कुस्ती फेस्टिवल मध्ये २०० मळणी सहभाग नोंदविला होता या मध्ये २० इवतींचा ही  समाविष्ट होता . या कुस्ती फेस्टिवल मध्ये वेगवेगळा गटात विजेत्यांना तब्बल लाख रुपयाचे बक्षीस वाटप करण्यात आले . 

      सध्याच्या युगात युवक व युवतीचे  मैदानी खेळांमध्ये दुर्लक्ष होत आहे . विशषेत कुस्ती सारख्या खेळाचे महत्व कमी होत आहे . याकडे तरुण पिढी आकर्षित व्हावी  याकरिता  लातूर येथिल   सृष्टी वेलफेअर सोसायटी व लातूर जिल्हा कुस्ती परिषद यांच्या संयुक्त विद्यमानने  लातूर कुस्ती फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये जवळपास २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता . विशिष्ट म्हणजे यात २० युवतींनीही सहभाग घेतला होता . या स्पर्धेसाठी कुमार गटातून ५ तर वरिष्ठ गटात असलेल्या ५ गटातून या स्पर्धकांनी  कुस्ती  स्पर्धा खेळली . स्पर्धेची सुरुवातीला  हनुमान चौकतील हनुमानाचे पूजन करून मल्लांची मिरवणूक काढण्यात आली . पुरुष गटातील स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तर महिला गटातील स्पर्धेचे उदघाटन शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुनीता चाळक यांच्या हस्ते करण्यात आले . 

       फेस्टिवल मध्ये झालेल्या खुल्या गटातील विजेत्यांसाठी झालेली कुस्ती दीपक कराड व हेमचंद्र सांडूर यांच्यात झाली यामध्ये दीपक कराड विजेता ठरलेला आहे . महिला गटातील सामना लक्ष्मी पवार व कोमल इगवे यांच्यात झाला . यामध्ये लक्ष्मी पवार विजेती ठरलेली आहे . या विजेत्यांना ढाल , रोख रक्कम  व प्रमाणपत्र देण्यात आले . तसेच विविध गटातील विजेत्यांना लाख रुपयांचे पारितोषिक वितिरित करण्यात आले . 

या कुस्ती फेस्टीव्हच्या यशस्वीते साठी  व्यवस्थापन समितीचे  मिथुनराजे गायकवाड ( अध्यक्ष ), भामडासिंग जुन्नी ( उपाध्यक्ष ), अॅड नरेश कुलकर्णी समनव्यक  ) विकासकांबळे ( सचिव ), बालाजी चौरे ( सहसचिव ), विशाल गिरी ( कोषाध्यक्ष ), कुमार कोतवाड ( सहसचिव ), सुरज झुंजे पाटील ( कार्याध्यक्ष ), अॅड युवराज इंगोलो ( कायदा सल्लागार ), अॅड राहुल कांबळे ( कायदा सल्लागार ), , बाळकृष्ण मोरे ( सदस्य ), प्रविण नाब्दे ( सदस्य ), मनोज डोंगरे ( सदस्य ) सौ. सुनिताताई चाळक ( महिला विभाग ), सौ. पल्लवीताई माने ( महिला विभाग ), अॅड. शैलेश गोजमगुंडे ( प्रमुख सल्लागार ), सुरेश जाधव ( सदस्य ), अॅड. ज्ञानेश्वर चेवले ( सदस्य ) आदींनी  परिश्रम घेतले . फेस्टिवलचे सूत्रसंचलन गोपी साठे तर प्रास्ताविक मिथुन गायकवाड यांनी केले . फेस्टिवलला स्पर्धकांसह लातुकारानी प्रतिसाद दिल्याबद्दल अँड . नरेश कुलकर्णी यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment