आशियायी देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल महाग का ? : अमित देशमुख यांचा संतप्त सवाल

Monday, September 10, 2018

लातूर: १० सप्टेंबर -भाजपचे सरकार आल्या पासून पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन दरवाढ मोठया प्रमाणात होत आहे. सद्या पाकिस्तान मध्ये ५१.६० रू, नेपाळ ६६.९९ रू, श्रीलंका ५०.६७ रू., भूतान ५७.०० रू प्रति लिटर दराने पेट्रोल मिळते. मग भारतातच पेट्रोल ९० रू. प्रति लिटर एवढे महाग का असा संतप्त सवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने १० सप्टेंबर रोजी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भारत बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर येथील उदय पेट्रोल पंप येथे निर्दशने केले. तसेच पंपावरील कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगीरी करून इंधन दरवाढी बददल केंद्र सरकारचा निषेध केला.

यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आशियायी देशातील इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल महाग का ? हेच अच्छे दिन का? सामान्य माणसाचे कंबरडे मोडून गोरगरीब जनतेचे खिसेकापू गळचेपी करणारे धोरण भाजप सरकार कडून राबवले जात आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसची दरवाढ करून सामान्य माणसाच्या जीवनात महागाईचाडोंगर उभा केला

महागाई कमी करण्यात राज्य व केंद्रसरकार सपसेल अपयशी ठरले आहे. रोजच्या जीवनातीलजीवनउपयोगी गोष्टी देखील महाग केल्या जात आहेत. जगभरात कच्च्या तेलाची किंमत कमी आहेत. त्यामुळे पेट्रोल भाव कमी होणे अपेक्षित होते. तत्कालीन काँग्रेस सरकार व भाजप सरकारची तुलना केली तर काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत येण्याची गरज असल्याचे सामान्य नागरिकांना आशा लागली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
इंधन दरवाढ महाघोटाला
इंधन दरवाढ करून भाजपने उद्योगपती लोकांचे भले करण्याचा प्रयत्न चालवला आहे. इंधन दरवाढीतुन १२ लाख कोटी रूपये भाजपा स्वताच्या खिशात घातल्याचा आरोप माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केला.


लातूरमध्ये सर्वाधिक पेट्रोल दर का?
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याच्या तुलनेत लातूरमध्ये पेट्रोल महाग का असा सवाल करत,राज्य सरकार अजुन दुष्काळाचा कर कमी करत तो आजही चालू असल्याचे सांगत इंधन दरवाढीचा जाहीर निषेध केला.या भारत बंद आंदोलनात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता आरळीकर, शहरजिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता खानापूरे, सपना किसवे, प्रा.शिवाजी जवळगेकर, पंचायत समिती सभापती शितल फुटाणे, औसा तालुकाध्यक्षा सरिता जगताप, दैवशाला राजमाने, मीना शेटे,नगरसेवक रवीशंकर जाधव,किशोर राजुरे,रामदास पवार, गोटू यादव, आयुब मनियार, पप्पू देशमुख, पुनीत पाटील, महेश काळे, अमोल शिंदे, प्रवीण पाटील,डॉ.बालाजी साळुंखे, प्रवीण सूर्यवंशी, जब्बार पठाण, आनंद वैरागे, व्यंकटेश पुरी, ज्ञानेश्वर सागावे, अकबर मडजे, हरीराम कुलकर्णी, चंद्रकांत सांळुके, मनोज देशमुख, सचिन सुर्यवंशी, शास्त्री चव्हाण, बालाजी कांबळे, अशोक देडे, चांदपाशा इनामदार, अविनाश बटटेवार, अमोल शिंदे,नागसेन कामेगावकर, शिवाजी कांबळे यासह युवक काँग्रेस, एनएसयूआय, विलासराव देशमुख युवा मंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment