आ विनायकराव पाटील यांचे आमरण उपोषण सुरू

Monday, February 4, 2019


चाकूर प्रतिनिधी :- प्रशासन आणि विमा कंपनीच्या मनमानी कारभारा मूळे चाकूर तालुक्याला रब्बी पीकविमा न मिळाल्यामुळे दुर्दैवाने मला सहकाऱ्यांसह आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे असं मत उपोषण स्थळी माजी मंत्री आ विनायकराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

पीकविमा केंद्र सरकार व राज्यसरकार व शेतकऱ्यांनी मिळून जवळ जवळ5 कोटी पेक्षा जास्त भरलेले असताना व निकषात बसत असताना जनिवपूर्व पीकविमा मिळालेला नाही व चाकूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून रास्त आणि न्याय मागण्यासाठी मी उपोषण करत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या मागण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सांभाजीराव पाटील, जिल्हाधिकारी जि श्रीकांत यांना निवेदन दिले आहेत असही आ विनायकराव पाटील म्हणाले

या आमरण उपोषणास अनेक लोकप्रतिनिधी भाजप चे पदाधिकारी होते या वेळा शिवसेनेचे सुभाष काटे यांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला.

येथील तहसील कार्यालयासमोर माजीमंत्री व अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचे आमदार विनायकराव पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना निवेदन देऊन चाकूर येथे आमरण उपोषणास सुरवात केली

आ विनायकराव पाटील यांनी चाकूर तालुका रब्बी पीक विमा त्वरित मंजूर करण्यात यावा , अहमदपूर तालुक्यातील राहिलेल्या गावामध्ये रब्बीपीक विमा त्वरीत मंजूर व्हावा ,लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या सहा अनेक मागण्याचा समावेश आहे .

या उपोषणास मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत पाटील, अभिमन्यू धोंडगे ,चाकूर पंचायत समितीचे उपसभापती वसंतराव डिघोळे, मॅचिंद्र नागरगोजे , अंकूश जनवडे, यातीराज केंद्रे ,प स सदस्य महेश वतते, श्रीमंत शेळके,उद्धवराव थोरात,मधुकरराव जाधव, विलासबापू सूर्यवंशी ,सरपंच बालाजी कलवले, मेघराज बाहेती,उपसरपंच बाबुराव सावंत, नागोराव आवळे , नागेशवाडी सरपंच इंद्राले, गोविंद घुगे ,ग्रामपंचायत सदस्य बोथी, बालाजी शेवाळे,गुंडेराव महात्मे , नामदेव इंद्राळे, रामेश्वर कुमडाले,मारुती ढाकणे ,गुंडेराव ,गणेश सूर्यवंशी,तुकाराम मारापल्ले, प्रताप पाटील ,महादेव वतते, नागनाथ बेंबडे ,बापूराव पाटील,गोपीनाथ जयभाये, अनिल चव्हाण ,माधव खलग्रे,दयानंद दांडिमे, सुंदर पाटील, सुभाष साके,राजू केचे , अशोकराव वाकळे, शंकर मुळे, प्रशांत भीमराळे, सुनिल जाधव,राम जाधव ,मोतीराम जयभाये,विष्णू कातपुरे, अजय काळे ,

माधव पुंडकरे कवठाली सरपंच,मनोहर पाटील पोलीस पाटील, धनराज पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर, कमलाकर शेकापुरे,तुकाराम देवकते, चंदू पाटील संचालक बाजार समिती अहमदपूर , गंगाधर मुळे, बळीराम बुडडे चेअरमन वि वि सोयायटी, राजू बुडडे ,राजेंद्र कैचें ,ज्ञानोबा गुंडले, सिद्धेश्वर पवार, लक्ष्मण पोटे, सुभाष साके सरपंच,माजी सभापती आर डी शेळके,अशोक चिंते आदी लोक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment